बदनामीची भीती घालून महिलेकडे मागितली ५० लाखांची खंडणी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:07 PM2023-01-11T18:07:56+5:302023-01-11T18:08:17+5:30
एका महिलेचा व वरील संशयितांचा हॉटेल व्यवसायाच्या भाडेपट्टयावरून पूर्वी वाद झाला होता.
सातारा : पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रार अर्जामुळे गुन्हा दाखल होऊन बदनामी होईल, अशी भीती घालून एका महिलेकडे तिघांनी प्रत्येकी ५० लाखांची खंडणी मागितली. या आरोपावरून सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिलीप जॉन भांबळ, अमरजित संभाजी भोसले (रा. सातारा), गोरख जगन्नाथ मरळ (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका महिलेचा व वरील संशयितांचा हॉटेल व्यवसायाच्या भाडेपट्टयावरून पूर्वी वाद झाला होता.
या अनुषंगाने संशयितांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. परंतु, काही दिवसांनंतर संशयितांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे, असे सांगून पीडित महिलेकडे प्रत्येकी ५० लाख मागण्यात आले. या प्रकाराचे महिलेने रेकॉर्डिंग ठेवले आहे.