सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:48 PM2017-10-16T14:48:22+5:302017-10-16T14:53:51+5:30
सातारा जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.
सातारा : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामधील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर काही ठिकाणी एखाद्या-दुसऱ्या जागेसाठी निवडणूक होत आहे. तसेच आज २५६ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.
सकाळपासून मतदानाला प्रारंभ झाला होता. अनेक ठिकाणी चुरशीने मतदान सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
सकाळी साडेअकरापर्यंत जिल्ह्यात ४०.४८ टक्के इतके मतदान झाले होते. तर दोन वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्यावर मतदानाचा आकडा गेला होता. संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.