एका दिवसात ५० पथके करणार सर्व्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:23+5:302021-03-05T04:39:23+5:30

दहिवडी : दहिवडी शहरात वाढणारी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सलग तेरा दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. चौदाव्यादिवशी मात्र लाॅकडाऊन चालूच ...

50 teams will survey in one day! | एका दिवसात ५० पथके करणार सर्व्हे!

एका दिवसात ५० पथके करणार सर्व्हे!

Next

दहिवडी : दहिवडी शहरात वाढणारी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सलग तेरा दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. चौदाव्यादिवशी मात्र लाॅकडाऊन चालूच राहणार आहे. शुक्रवारी संपूर्ण दहिवडी शहराचा एकाचवेळी घर टू घर सर्व्हे करण्यात येणार आहे. यासाठी डाॅक्टर, अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य कर्मचारी यांची ५० पथके तयार करण्यात येणार आहेत आणि संपूर्ण दहिवडी शहराची माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीला प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, मुख्याधिकारी युवराज कुंभार, वैद्यकीय अधिकारी शेळके, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, उपनगराध्यक्ष नीलम शिंदे उपस्थित होत्या.

यावेळी दहिवडी शहराचा आढावा घेण्यात आला. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी की नाही, यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आणखी लाॅकडाऊन दहिवडी शहराला परवडणारे नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाची साखळी तोडणे व दुसरीकडे लाॅकडाऊन उठवणे या दोन्हीबाबत सर्व्हे झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र लाॅकडाऊन सुरूच राहणार आहे. गेली अनेक दिवस दहिवडीसाठी मेहनत घेणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण कोडलकर व डाॅ. हेमंत जगदाळे हे कोरोना पाॅझिटिव्ह आले असून, दोघांनाही क्वारंटाईन केले आहे. म्हसवडच्या डाॅ. शेळके यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.

कोट..

पन्नास पथकांच्या माध्यमातून वनटाईम सर्व्हे करण्यात येणार असून, त्यानंतर लाॅकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल.

- धनाजी जाधव, नगराध्यक्ष, दहिवडी

04दहिवडी

फोटो : दहिवडी शहराचा कोरोनाबाबत गुरुवारी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. यावेळी तहसीलदार बाई माने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, डाॅ. शेळके मुख्याधिकारी कुंभार उपस्थित होते.

Web Title: 50 teams will survey in one day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.