कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:27+5:302021-01-20T04:39:27+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच चालले असून मंगळवारी ५३ नवीन बाधित स्पष्ट झाले. त्यामुळे रुग्णांचा आकडा ...
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच चालले असून मंगळवारी ५३ नवीन बाधित स्पष्ट झाले. त्यामुळे रुग्णांचा आकडा ५५ हजार ७१० वर पोहोचला, तर एकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दिवसभरात ६८ जणांना घरी सोडण्यात आल्याने कोरोनामुक्तांची संख्या ५३ हजार १६० झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री जाहीर केल्यानुसार, ४३ नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. या बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील ८ जणांचा समावेश आहे, तर कऱ्हाड तालुक्यातही नवीन काही रुग्णांची नोंद झाली. तसेच पाटण, फलटण, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यातही कोरोनाचे नवीन रुग्ण स्पष्ट झाले आहेत, तर एका बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात वाई तालुक्यातील गुळुंब येथील ७३ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. कोरोनाने आतापर्यंत १ हजार ८०६ जणांचा बळी गेला आहे.
चौकट :
४२५ जणांचे नमुने तपासणीला...
मंगळवारी दिवसभरात ४२५ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील ४५, कऱ्हाड १०५, फलटण ४, कोरेगाव येथील १६, वाई ४१, खंडाळा २, रायगाव येथील ७, पानमळेवाडी ९५, महाबळेश्वर १०, दहिवडी येथील १६, म्हसवड १२, पिंपोडे ६, तरडगाव १९ आणि कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ४७ असे एकूण ४२५ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
................................................................