५५ हजार जणांच्या हाती टिकाव, खोरे अन् पाटी ! सातारा वॉटर कप स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 07:55 PM2018-05-02T19:55:51+5:302018-05-02T19:55:51+5:30

सातारा : पाणी फाउंडेशनच्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जिल्हयात खरंच पाण्यासाठी तुफान आल्याचं चित्र आहे. १ मे रोजी तर दीडशेहून अधिक गावांत महाश्रमदान झालं.

55 thousand people in their hands, the valley and the valley! Satara Water Cup Tournament | ५५ हजार जणांच्या हाती टिकाव, खोरे अन् पाटी ! सातारा वॉटर कप स्पर्धा

५५ हजार जणांच्या हाती टिकाव, खोरे अन् पाटी ! सातारा वॉटर कप स्पर्धा

Next
ठळक मुद्देदीडशेहून अधिक गावांत महाश्रमदान; माण तालुक्यात ३५ हजारजण सहभागी

सातारा : पाणी फाउंडेशनच्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जिल्हयात  खरंच पाण्यासाठी तुफान आल्याचं चित्र आहे. १ मे रोजी तर दीडशेहून अधिक गावांत महाश्रमदान झालं. त्यामध्ये सुमारे ५५ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. माण तालुक्यात सर्वाधिक ३५ हजार लोकांनी महाश्रमदानात हाती टिकाव, खोरे अन् पाटी घेतली. खटाव तालुक्यातील ५२ गावांत ११ हजार १९५ तर कोरेगावमधील ४१ गावांत ९ हजार ३५३ लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला. ग्रामस्थांसह पुणे, मुुंंबईला असणारे नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनीही श्रमदानात वाटा उचलला.

वाठार स्टेशन : पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेंतर्गत करंजखोप, जांब बुद्रुक व पळशी या गावांसह कोरेगाव तालुक्यातील सर्व ४१ गावांनी महाराष्ट्र दिनी आपापल्या गावात महाश्रमदान केले. यामध्ये सेलिब्रेटी, आमदार यांच्यासह बहुसंख्य मुंबई, पुणेकरांनी सहभाग घेतला. सुमारे ९ हजार ५०० लोकांनी महाश्रमदान केले.
दि. ८ एप्रिलपासून तिसरी वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. ही स्पर्धा आता एक लोकचळवळ बनली असून, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांत तर रात्रीचेही श्रमदान सुरू आहे. कोरेगाव तालुक्यातील ४१ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या गावांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त पहाटे पाचपासून गावागावात श्रमदानास सुरुवात झाली. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बनवडी, पळशी, दुधनवाडी या गावात श्रमदान केले. यावेळी त्यांनी गावांना ५ लाख रुपयांची वैयक्तिक मदत दिली.
याशिवाय तळिये, वाठार स्टेशन, बनवडी, इब्राहमपूर, पिंपोडे बुद्रुक, रणदुल्लाबाद गावात महाश्रमदान हे सण म्हणून साजरा करण्यात आले. तसेच गावातील नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडलेल्या युवकांनी आपापल्या गावात श्रमदान केले व आर्थिक मदतही केली.

म्हसवड : रांजणीकरांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम हाती घेतले असून, १ मेच्या महाश्रमदानात या गावातील ४६ माहेरवाशिणींनी आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी आपल्या पतीसह हजेरी लावून श्रमदान केले. तर रांजणी ग्रामस्थांनी या आलेल्या माहेरवाशिणींना माहेरची साडी, टॉवेल, टोपीचा आहेर दिला.रांजणी गाव कायम दुष्काळी असल्याने येथील अनेकजण पोटापाण्यासाठी स्थलांतरित झाले असून, हजारो एकर जमीन पाण्याअभावी पडीक बनली आहे. या सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातील प्रमुख मंडळीच्या पुढाकाराने यंदाच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत या गावाने सहभागी होऊन गाव पाणीदार करून दुष्काळाला बाय बाय करण्यासाठी गावातील व बाहेर पोटापाण्यासाठी गेलेली मंडळी गावाकडे येऊन श्रमदानात सहभागी होऊ लागली. १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. या महाश्रमदानात सहभागी होण्यासाठी या गावच्या ४६ माहेरवाशीण आपल्या पतीदेवांबरोबर श्रमदानात सहभागी होत आपल्या गावचा दुष्काळ हटवण्यासाठी हातात टिकाव, फावडे, पाटी घेत श्रमदान केले. ग्रामस्थांनीही आपल्या माहेरी आलेल्या मुलींना माहेरची साडीचोळी व जावयांना टॉवेल, टोपी देत आहेर केला.

सध्या रांजणीत मोठ्या उत्साहात रांजणीकर श्रमदान करत असून आबालवृद्ध, महिला, नागरिक, तरुण तरुणी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत असून, या स्पर्धेत आपल्या गावचा पहिला नंबर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
याठिकाणचा ग्रामस्थांचा उत्साह वाढवण्यासाठी माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, डॉ. प्रमोद गावडे, उपसभापती नितीन राजगे, माणदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक माने, अ‍ॅड. राजाराम बनसोडे, नानासाहेब दोलताडे, सरपंच गजराबाई दोलताडे, अप्पासाहेब पुकळे, बाळाप्रसाद किसवे, तानाजी दोलताडे, गजराबाई दोलताडे, राधिका दोलताडे, संतोष दोलताडे, तुकाराम दोलताडे, कासलिंग जानकर, अजय दोलताडे, महादेव दोलताडे, नामदेव दोलताडे यांनी श्रमदान केले.
महिलांचा लक्षणीय सहभाग

महाश्रमदानात नवविवाहित दाम्पत्य अनिल दोलताडे व अर्चना दोलताडे या नवविवाहित जोडप्याने बाशिंगासहीत श्रमदान केले. यांचा विवाह ३० एप्रिलला मोठ्या उत्साहात पार पडला. दुसºया दिवशी १ मेला बाशिंग सोडवण्याअगोदर श्रमदान करून श्रमदानकर्त्यांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.

 

Web Title: 55 thousand people in their hands, the valley and the valley! Satara Water Cup Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.