५६ ग्रामपंचायतींचे जावळीत धुमशान
By admin | Published: July 1, 2015 10:30 PM2015-07-01T22:30:20+5:302015-07-02T00:30:25+5:30
दुसरा टप्पा : दरेखुर्द, महिगाव, हुमगाव ग्रामपंचायतींचा समावेश
कुडाळ : जावळी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात एकूण ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये सभापती सुहास गिरी यांची महिगाव, उपसभापती निर्मला कासुर्डे यांची वरोशी, दीपक पवार यांची दरेखुर्द, मोहन शिंदे यांची हुमगाव तर संगीता चव्हाण यांच्या करंदी तर्फ कुडाळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या टप्प्यात अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने जावळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.तालुक्यातील आंबेघर, अंधारी, चोरांबे, इंदवली, करंदी तर्फ कुडाळ, केंजळ, मालचौंडी, मरडमुरे, म्हाते खु. पिंपळी, उंबरीवाडी, आंबेघर तर्फ मेढा, बेलावडे, डांगरेघर, रायगाव, बोंडारवाडी, बामणोली, बेलोशी, गवडी, भिवडी, हातगेघर, आलेवाडी, करंदी तर्फ मेढा, कारगाव, खर्शी तर्फ कुडाळ, कोलेवाडी, कुडाळ, निपाणी, पिंपरी तर्फ मेढा, रानगेघर, रेंगडी, सर्जापूर, वहागाव, करंदोशी, महू, पुनवडी, सनपाने, वरोशी, भुतेघर, बामणोली तर्फ कुडाळ, दरे बु।।, दरेखुर्द, हुमगाव, करंजे, महिगाव, निझरे, रांजणी, सरताळे, सायगाव, वेळे, मामुर्डी.तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिगाव, दरेखुर्द, हुमगाव, वरोशी, करंदी तर्फ कुडाळ या पदाधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याबरोबरच कुडाळ, बामणोली तर्फ कुडाळ, आलेवाडी, सरताळे, करंजे, सायगाव, रायगाव या राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींचादेखील समावेश आहे. आत्तापासूनच एकमेकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)