कोयना धरणातून ५७ हजार क्युसेकने पाणी सोडणे सुरू, १०२ टीएमसी साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 03:22 PM2018-08-23T15:22:00+5:302018-08-23T15:24:02+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत.
जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम असलीतरी पश्चिम भागात गेल्या दीड महिन्यापासून मुसळधार सुरू आहे.
पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असलेतरी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणे भरली आहेत. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. सद्य:स्थितीत कोयना धरण भरल्यातच जमा आहे. पाण्याची आवक होत असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी आठपर्यंत कोयना धरण परिसरात ८० मिलीमीटर पाऊस झाला होता. धरणात १०२.६५ टीएमसी साठा असून, सहा दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. दरवाजातून ५५२७७ तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.