वखार महामंडळाला ५८ कोटींचा नफा

By admin | Published: December 23, 2014 09:37 PM2014-12-23T21:37:14+5:302014-12-23T23:48:16+5:30

प्रत्येकी दोन कोटींचा केंद्र व राज्य शासनाला लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द

58 crores profit for warehousing corporation | वखार महामंडळाला ५८ कोटींचा नफा

वखार महामंडळाला ५८ कोटींचा नफा

Next

फलटण : राजाळे, ता. फलटण गावचे सुपुत्र विश्वासराव भोसले हे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाला चालू वर्षात ५७.७६ कोटी नफा मिळाला. याचा प्रत्येकी दोन कोटींचा केंद्र व राज्य शासनाला लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे ‘द वेअर हाऊसिंग कार्पोरेशन अ‍ॅक्ट १९६२’ नुसार कार्यरत असून, शेतमाल व्यवस्थापनाचे काम करते. १९५७ सालापासून महामंडळ नफ्यात असून, महामंडळाने मागील पन्नास वर्षांत ११ लाख मे. टन साठवणूक क्षमता तयार केली होती. मागील चार वर्षांत विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा लाख मे. टन अतिरिक्त साठवणूक क्षमता तयार करून महामंडळाने देशात उच्चांक प्रस्थापित केला आहे. महामंडळास चालू वर्षात ५७.७६ कोटी इतका नफा मिळाल्याने त्यावर केंद्र व राज्य शासनास दोन कोटी प्रत्येकी लाभांश जाहीर केला आहे.
नागपूर येथे शासनाचा धनादेश राज्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री राम शिंदे, विश्वासराव भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
यावेळी कृषी व पणन विभागाचे अप्पर प्रशासकीय डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी उत्पन्न डॉ. उमाकांत दांगट, वखार महामंडळाचे सह. व्यवस्थापकीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 58 crores profit for warehousing corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.