सातारा जिल्ह्यात कोरोनाचे ५८ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:37+5:302021-01-04T04:32:37+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण अद्यापही आढळून येत असून रविवारी नवे ५८ रुग्ण आढळून आले असून, बाधितांची संख्या ५५ ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण अद्यापही आढळून येत असून रविवारी नवे ५८ रुग्ण आढळून आले असून, बाधितांची संख्या ५५ हजार ६४ वर पोहोचली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री आलेल्या ६१ जणांच्या अहवालामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात शनिवारी रात्री ६१ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आले असून, यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला. अधून-मधून कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या कधी वाढतेय तर कधी कमी होतेय. गत दोन दिवसांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता; परंतु तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील मोळाचा ओढा आयटीआय रोड परिसरात राहणाऱ्या ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण वाढले असून, रविवारी दिवसभरात ११ जण तर आतापर्यंत ५२ हजार ९१ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तसेच जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७९४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात आता तपासणीसाठी हळूहळू गर्दी कमी होऊ लागली आहे. कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याने नागरिक निर्धास्त झाले आहेत.