सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे ६० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:00+5:302021-01-10T04:31:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून, शनिवारी रात्री नवे ६० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून, शनिवारी रात्री नवे ६० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ५५ हजार २१० वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधून-मधून सुरूच असून, शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे बळींची संख्या १ हजार ७९९ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९१ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले. यामध्ये एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण वाढले असून, शनिवारी दिवसभरात ३७ जण, तर आतापर्यंत ५२ हजार ५७२ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच शनिवारी २७१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.