शिक्षकांच्या पगाराचे ६१ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:43 AM2021-08-13T04:43:47+5:302021-08-13T04:43:47+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड नगर परिषद शिक्षण मंडळाकडील शिक्षकांची १० टक्केप्रमाणे ६० लाख ८१ हजार ८१० रुपये पगाराची रक्कम नगर ...

61 lakh sanctioned for teachers' salaries | शिक्षकांच्या पगाराचे ६१ लाख मंजूर

शिक्षकांच्या पगाराचे ६१ लाख मंजूर

Next

कऱ्हाड : कऱ्हाड नगर परिषद शिक्षण मंडळाकडील शिक्षकांची १० टक्केप्रमाणे ६० लाख ८१ हजार ८१० रुपये पगाराची रक्कम नगर परिषदकडे येणे बाकी होती. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी थकीत रक्कम न मिळाल्यास नगर परिषदेसमोर १७ ऑगस्टपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

यासंदर्भात सत्तारूढ गटाचे नेते राजेंद्र यादव यांनी संघटना पदाधिकारी व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची तातडीने बैठक आयोजित करून थकीत ६१ लाख रुपये दोन दिवसात देण्याचे मान्य केले. याबाबत नगर संचालक कार्यालयाकडून नुकतेच अनुदान प्राप्त झाले असून, सर्व थकीत रक्कम दोन दिवसात अदा करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी यासाठी सहकार्य केले. या बैठकीला आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, एल. बी.गवळी, अरविंद पाटील, अविनाश भोसले, संग्राम गाढवे, विक्रम सपकाळ, सचिन माने आदी उपस्थित होते.

Web Title: 61 lakh sanctioned for teachers' salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.