जिल्हा परिषदेच्या ६३५ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, पुन्हा कर्तव्यावर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:29 PM2020-11-11T19:29:26+5:302020-11-11T19:30:43+5:30

coronavirus, zp, satara कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून जिल्हा परिषदेचे ७२१ कर्मचारी आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यामधील ६३५ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली. संबंधित कर्तव्यावरही रुजू आहेत ही बाब कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी काढले.

635 Zilla Parishad employees beat Corona | जिल्हा परिषदेच्या ६३५ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, पुन्हा कर्तव्यावर हजर

जिल्हा परिषदेच्या ६३५ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, पुन्हा कर्तव्यावर हजर

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या ६३५ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, पुन्हा कर्तव्यावर हजर कोरोना लढ्यातील कामाबद्दल अधिकाऱ्यांकडून कौतुक

सातारा : कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून जिल्हा परिषदेचे ७२१ कर्मचारी आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यामधील ६३५ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली. संबंधित कर्तव्यावरही रुजू आहेत ही बाब कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी काढले.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी म्हटले आहे की, ह्यकोरोना विषाणूचे संकट संपविण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपाय योजना पूर्ण क्षमतेने राबविण्यात येत आहेत. याला नागरिकांनी आजवर प्रतिसाद दिला आहे. कर्मचाऱ्यांनीही मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना केला आणि करीत आहेत. येथून पुढेही गाफील न राहता प्रतिसाद द्यावा.

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी गेली सात महिने अविरतपणे कर्तव्य बजावत असताना कोरोनाशी लढा दिला आहे. आजवर ७२१ पैकी ६३५ कर्मचारी पूर्णत: बरे झाले आहेत. इतरांवर यशस्वी उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग, अंगणवाडी, पोलीस तसेच महसूल विभाग अशा सर्वांच्या प्रयत्नातून हे यश मिळत आहे. शेकडो कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता कोरोना नियंत्रणाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. अजूनही त्यांचे काम सुरूच आहे, याचा विशेष अभिमान वाटतो.

कोरोना रोखण्यासाठी इतर उपायांबरोबरच जनजागृतीही पूर्ण क्षमतेने करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे सर्वच अधिकारी आणि संबंधित कर्मचारी कोरोना नियंत्रणासाठी झटत आहेत. जनतेने येथून पुढेही सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. कर्मचाऱ्यांनीही स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जाधव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Web Title: 635 Zilla Parishad employees beat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.