सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत ६७ लाखांचा घोटाळा, चेअरमनसह १६ संचालकांवर गुन्हा

By दत्ता यादव | Published: March 8, 2023 08:32 PM2023-03-08T20:32:43+5:302023-03-08T20:46:19+5:30

सचिव अशोक नावडकर यांच्या बचत खात्यामध्ये ३,८२,१०० रकमेचा पोकळ जमाखर्च दाखविला. 

67 lakhs scam in Songaon's Suvarna Credit Institution, 16 directors along with chairman booked | सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत ६७ लाखांचा घोटाळा, चेअरमनसह १६ संचालकांवर गुन्हा

सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत ६७ लाखांचा घोटाळा, चेअरमनसह १६ संचालकांवर गुन्हा

googlenewsNext

सातारा : सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फे सातारा येथील सुवर्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ६७ लाख ५१  हजार ९१० रुपयांचा घोटाळा झाला असून, याप्रकरणी संस्थेच्या चेअरमनसह १६ संचालकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संस्थेचे चेअरमन महिपती नावडकर, उपाध्यक्ष शरद नारायण रोकडे, संचालक अंकुश संपतराव जाधव, हिम्मत महादेव जाधव, शंकर तुकाराम जाधव, केशव रघुनाथ नावडकर, सतीश शंकर नावडकर, अनिल (शरद) महादेव जाधव, अनिल दयानंद कांबळे, रघुनाथ पांडुरंग जाधव, सुवर्णा अविनाश नावडकर, सुरेखा मोहन जाधव, बाबूराव जयसिंग नावडकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शासकीय लेखापरीक्षक शैलेश जाधव (वय ४३, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांनी सुवर्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे २०२० ते २०२२ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. त्यामध्ये त्यांना विविध प्रकारच्या बोगस नोंदी आढळून आल्या. लेखापरीक्षण फी २७ हजार ३८८ नावे टाकल्याचे आढळले. सचिव अशोक नावडकर यांच्या बचत खात्यामध्ये ३,८२,१०० रकमेचा पोकळ जमाखर्च दाखविला. 

ठेवतारण कर्ज व व्याज प्रत्यक्षात रोखीने जमा झाल्याचे दाखविले. ठेवी व त्यावरील व्याज रोखीने अदा केल्याचे दाखवून ६२ लाख ९३ हजार ७२ रुपये जमा रोख नावे टाकले. सन २००९ या  आर्थिक  वर्षातील ४७००० मुदत ठेव आणि त्यावरील व्याज २३४९ इतक्या व्यवहाराची पोकळ नोंद केल्याचे समोर आले. तसेच ठेवीदारांच्या ठेवीदारांची मुदत पूर्ण होऊनही ठेवीदारांच्या ठेवीच्या  रकमा व त्यावरील व्याज त्यांना परत न देता त्याचा अपहार केला. पोलिस उपनिरीक्षक दळवी हे अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: 67 lakhs scam in Songaon's Suvarna Credit Institution, 16 directors along with chairman booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.