तपासणीविना धावतायत ६७ स्कूलबस-सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 08:32 PM2018-06-28T20:32:25+5:302018-06-28T20:33:00+5:30
कोल्हापूर येथे एका स्कूलबसचा अपघात झाल्यानंतर स्कूलबसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही सातारा शहरासह जिल्'ात विद्यार्थी
सातारा : कोल्हापूर येथे एका स्कूलबसचा अपघात झाल्यानंतर स्कूलबसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही सातारा शहरासह जिल्'ात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ६७ बसेस अवैधरीत्या तपासणीविना फिरत आहेत. या बसेसवर कडक कारवाई करण्याची मोहीम उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे.
कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी कंटेनर आणि स्कूलबसची धडक होऊन तीनजण ठार तर २४ जण जखमी झाले होते. या अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली. याची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, राज्यभरात स्कूलबसवर कारवाई चालू करण्यात आली आहे.सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे एकूण ५५२ स्कूलबसची नोंद आहे. त्यापैकी सुमारे ४८५ बसेसने तपासणी करून आपले फिटनेस सर्टिफिकेट घेतले आहे. मात्र, अद्याप ६७ बसेस तपासणीविना रस्त्यावर धावत आहेत. अशा बसचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची कारवाई
सातारा शहरात ग्रेड सेपरेटरच्या बांधकामामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस प्रशासनानेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांविरुद्ध मोहीम सुरू करून वाहनचालकांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसूल केली.
शासनाच्या सूचना न आल्याने तपासणी शिबिर नाही
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशनानुसार वर्षापूर्वी राज्यातील सर्व स्कूलबससाठी मे महिन्यात शिबिराचे आयोजन करून त्यांची तपासणी केली होती. मात्र, यावर्षी शासनाकडून तशा सूचना न आल्याने प्रशासनाने यंदा तपासणी शिबिराचे आयोजन केले नाही. परिणामी काही बसेस तपासणीविना रस्त्यावर धावत आहेत.
सातारा जिल्हा स्कूलबस असोसिएशन व काही शाळांच्या मागणीनुसार बसचे लॉट करून सुटीच्या दिवशी कºहाड येथे काही स्कूलबसची तपासणी केली होती. ज्या स्कूलबसने तपासणी केली नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
-संजय धायगुडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी