सातारा जिल्ह्यातील आठ शिक्षकांना ६८ लाखांना फसविले

By admin | Published: November 17, 2016 09:03 PM2016-11-17T21:03:34+5:302016-11-17T21:03:34+5:30

रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून जिल्ह्यातील आठ शिक्षक आणि प्राध्यापकांची तब्बल ६८ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सध्या नागपूर

68 lakhs of eight teachers in Satara district | सातारा जिल्ह्यातील आठ शिक्षकांना ६८ लाखांना फसविले

सातारा जिल्ह्यातील आठ शिक्षकांना ६८ लाखांना फसविले

Next

आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 17 :  रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून जिल्ह्यातील आठ शिक्षक आणि प्राध्यापकांची तब्बल ६८ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सध्या नागपूर येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ लेखाधिकारी शबनम शेख व पती सलीम शेखसह (रा. अजिंक्य कॉलनी, सदर बझार सातारा) तिघांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शबनम शेख या येथील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना त्यांनी व त्यांचा पती सलीम शेख आणि अब्दुल करीम शेख यांनी शिपाई पदापासून ते प्राध्यापकापर्यंत अशा आठजणांना ह्यनोकरीस लावतो, असे आमिष दाखवून ६८ लाख ७५ हजार रुपये उकळले. काही महिन्यांपूर्वी त्यांची नागपूर येथे बदली झाली. तर सलीम शेख हा साताऱ्यातील एका बँकेमध्ये काम करत आहे. ज्यांची फसवणूक झाली. त्या लोकांनी पैसे परत मिळण्यासाठी त्यांच्याकडे तगाला लावला. मात्र, त्यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने अखेर सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन शहर पोलिस ठाण्यात हा प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून शबनम शेख आणि त्यांचे पती सलीम शेखसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास हवालदार वसंत साबळे आणि संजय शिर्के हे करीत आहेत.

यांची झाली फसवणूक..

भानुदास ज्योतिराम जाधव - ६ लाख ५० हजार,
वीरेंद्र जाधव- ६ लाख ५० हजार
संजय सूळ (रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण) - ३ लाख ७५ हजार
अशोक शिंदे (रा. कोळकी, ता. फलटण) - ४ लाख ५० हजार
विठ्ठल गावडे (रा. बरड, ता. फलटण)- ६ लाख ५० हजार
सुजाता टेकाडे (रा. शिरवळ, ता. खंडाळा) - १४ लाख
योगेश बोराटे (रा. कुडाळ, ता. जावळी)- ८ लाख
कविता पाटील (रा. कोरेगाव)- ७ लाख ५० हजार
दिनेश साळुंखे (रा. किवळ, ता. कऱ्हाड) ११ लाख ५० हजार
दरम्यान, यातील काही शिक्षकांना शेख दाम्पत्याने धनादेश दिले होते. मात्र, ते बँकेमध्ये वटले नाहीत. आणखी बऱ्याच जणांची फसवणूक झाली असून, हा आकडा जवळपास ६३ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोने विकून दिले पैसे !
मुलाला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिपाई पदासाठी नोकरी लागतेय म्हटल्यानंतर वडिलांनी घरात असलेले सर्व सोने सराफाकडे नेऊन विकून टाकले. हे पैसेही कमी पडत असल्याने अखेर त्यांनी घरातील धान्य विकले आणि शेख दाम्पत्याला पैसे दिले, हा किस्सा सांगत असताना एक पोलिसच भावनाविवश झाला होता.

Web Title: 68 lakhs of eight teachers in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.