बोगस कर्जप्रकरणी ‘कृष्णा’च्या सात माजी संचालकांना अटक

By admin | Published: April 15, 2017 09:23 PM2017-04-15T21:23:11+5:302017-04-15T21:23:35+5:30

बोगस कर्ज प्रकरण : क-हाड पोलिसांचे छापासत्र; चौघे न्यायालयीन तर तिघांची पोलीस कोठडीत रवानगी

7 former directors of Krishna arrested in bogus loan | बोगस कर्जप्रकरणी ‘कृष्णा’च्या सात माजी संचालकांना अटक

बोगस कर्जप्रकरणी ‘कृष्णा’च्या सात माजी संचालकांना अटक

Next
>ऑनलाईन लोकमत
क-हाड (सातारा), दि. 15 -  बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील अटकेत असतानाच शनिवारी या प्रकरणात सात माजी संचालकांनाही पोलिसांनी अटक केली. सकाळी एकाचवेळी सर्व माजी संचालकांच्या घरांवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी सातजण पोलिसांच्या हाती लागले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अटक केलेल्यांपैकी चौघांना न्यायालयीन तर तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 
 
अशोक मारुती जगताप (वय ५५, रा. वडगाव हवेली), सर्जेराव रघुनाथ लोकरे (५२, रा. येरवळे, ता. कºहाड), संभाजी रामचंद्र जगताप (७३, कोडोली, ता. कºहाड), बाळासाहेब दामोदर निकम (६९, रा. शेरे, ता. कºहाड), उदयसिंह प्रतापराव शिंदे (५०, रा. बोरगाव), वसंत सीताराम पाटील (६८, रा. नेर्ले, ता. वाळवा), महेंद्र ज्ञानू मोहिते (५६, रा. वाटेगाव, ता. वाळवा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या माजी संचालकांची नावे आहेत. 
 
क-हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. याबाबत ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. कृष्णा कारखान्याच्या २०१४-१५ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक करणाºया वाहनधारकांना प्रत्येकी ७ लाखांप्रमाणे परतफेड करण्याची नोटीस बँक ऑफ इंडियाकडून पाठवण्यात आली होती. तांबवे येथील वाहतूकदार यशवंत पाटील यांनाही नोटीस २६ नोव्हेंबर २०१५ रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर यशवंत पाटील यांच्यासह अन्य ऊस वाहतूकदारांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावे कर्ज प्रकरण असल्याचे समोर आले. संबंधित शेतक-यांनी २०१३-१४ मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाही. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाखांचे कर्ज उचलण्यात आल्याचे बँकेच्या नोटिसीनंतर समोर आले. या प्रकरणात १४ फेब्रुवारी रोजी अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली. सध्या ते दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, शनिवारी सकाळी कºहाड शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाचवेळी कृष्णाच्या तत्कालीन संचालक मंडळांच्या घरावर छापे टाकले. साता-यासह सांगली जिल्ह्यात हे छापासत्र करण्यात आले. त्यामध्ये सात संचालक पोलिसांना घरामध्ये आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.
५७ कोटी रुपये बँक खात्यात सील
पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाचा सखोल तपास केला असून, सुमारे ५८ कोटींची बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचे समोर आले आहे. या रकमेपैकी ५७ कोटी रुपये बँक आॅफ इंडियामध्ये एका खात्यावर जमा आहेत. ती रक्कम सील करण्यात आली आहे. तसे पत्र बँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांना देण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशाशिवाय या रकमेबाबत कसलाच व्यवहार केला जाणार नाही, असे तपास अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
संचालकांनी बैठकीत ठराव केला
कर्ज प्रकरणाबाबत तत्कालीन संचालक मंडळाच्या वेळोवेळी बैठका झाल्या होत्या. त्या बैठकांमध्ये कर्जाबाबतची कार्यवाही झाली आहे. तसेच एका बैठकीत सर्व संचालक मंडळाने ठराव करून अध्यक्ष, उपाध्यक्षांना कर्जाबाबत निर्णय घेण्याचा व सही करण्याचा अधिकार बहाल केला असल्यामुळे तेही या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले, असे निरीक्षक जाधव म्हणाले. 
 
बँक अधिका-यांनाही होणार अटक
कृष्णाच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळासह बँक अधिकाºयांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप फिर्यादीतच करण्यात आला आहे. तसेच पोलीस तपासातूनही काही मुद्दे समोर आले आहेत. त्यामुळे तपासात या प्रकरणामध्ये सहभागी असणाºया बँक अधिका-यांनाही अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
तीसहून अधिक जणांना अटक होणार!
माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी यांच्यासह सुमारे तीस जणांना याप्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. त्यापैकी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सात संचालकांना अटक झाली असून, पुढील कार्यवाही सुरूच असल्याचेही यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले. 
 
प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी
अटक करण्यात आलेल्या सात संचालकांना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकार व बचाव पक्षाचच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. अटक केलेल्यांपैकी अशोक जगताप, सर्जेराव लोकरे, संभाजी जगताप व बाळासाहेब निकम या चौघांना प्रकृतीच्या कारणास्तव पोलीस प्रक्रिया राखून ठेवून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर उदयसिंह शिंदे, वसंत पाटील व महेंद्र मोहिते या तिघांना दि. १८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Web Title: 7 former directors of Krishna arrested in bogus loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.