जिल्ह्यातील ७ लाख नागरिकांना मिळाला लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:44+5:302021-05-28T04:28:44+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण चार महिन्यांपासून सुरू असले तरी मोठ्या प्रमाणात लस मिळत नसल्याने मोहीम संथगतीने सुरू आहे. ...

7 lakh citizens of the district got the first dose of vaccine | जिल्ह्यातील ७ लाख नागरिकांना मिळाला लसीचा पहिला डोस

जिल्ह्यातील ७ लाख नागरिकांना मिळाला लसीचा पहिला डोस

Next

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण चार महिन्यांपासून सुरू असले तरी मोठ्या प्रमाणात लस मिळत नसल्याने मोहीम संथगतीने सुरू आहे. तर आतापर्यंत ७ लाखांहून अधिक नागरिकांना पहिला, तर ७८ हजार लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमार्बीड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयांत ही सुविधा सुरू झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.

एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला; पण ही लसीकरण मोहीम बारगळली. कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने राज्य शासनानेच लसीकरणाला स्थगिती दिली. तर सातारा जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. त्याचबरोबर सवा नऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी आहेत.

जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून केंद्रात सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात. आतापर्यंत जिल्ह्याला ७ लाख १५ हजार कोरोना लसीचे डोस मिळालेले आहेत. त्यातील पहिला डोस ७ लाख २ हजार ७६७ नागरिकांना देण्यात आला आहे.

पॉइंटर :

- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले कोरोना लसीच डोस ७१५९१०

- लसीकरण झाले ७०२७६७

६० वर्षांवरील नागरिक

- प्रथम डोस २५२२२१

- दुसरा डोस ४८४२७

४५ ते ५९ वयोगट

- पहिला डोस २४२२३६

- दुसरा डोस २८७५१

...............................................................

Web Title: 7 lakh citizens of the district got the first dose of vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.