साताऱ्यातील १५ एटीएम सेंटरमधून २४ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 10:01 AM2020-03-14T10:01:47+5:302020-03-14T10:04:11+5:30

स्टेट बँकेनेही सिस्टिमला नोंद नसल्याने संशयितांना काही रक्कम परत केली होती. मात्र, तोच प्रकार वारंवार घडू लागल्याने स्टेट बँकेच्या अधिका-यांना संशय आला. त्यांनी एटीम मशीन मधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मात्र, तोपर्यंत बरीच रक्कम

 7 lakhs grabbed from 7 ATM centers in Satara | साताऱ्यातील १५ एटीएम सेंटरमधून २४ लाख हडपले

साताऱ्यातील १५ एटीएम सेंटरमधून २४ लाख हडपले

googlenewsNext
ठळक मुद्देअज्ञात चारजणांवर गुन्हा : स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची तक्रार

सातारा : शहरातील स्टेट बँकेच्या तब्बल १५ एटीममशीनमध्ये तांत्रीक बिघाड करून तब्बल २४ लाख ८१ हजार ५०० रुपयांची रोकड हडप केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी अज्ञात चारजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अज्ञात चारजणांनी २६ जानेवारी ते २ मार्च दरम्यान वेळोवेळी त्यांच्या बँक खात्याच्या एटीएममधून २४ लाख ८१ हजार ५०० रुपये काढले. पैसे काढताना संशयितांनी एटीएम मशीनच्या कॅश शटरला हाताने उचलून धरून त्यात तांत्रीक बिघाड केल्याने रक्कम निघाली. मात्र, ती बँकेच्या सिस्टिमला नोंदली गेली नाही. परिणामी संशयितांनी आमचे पैसे निघाले नाहीत, असे सांगत त्यांच्या बँकेमार्फत पैसे रिफंड करण्यासाठी स्टेट बँकेकडे तक्रार केली. स्टेट बँकेनेही सिस्टिमला नोंद नसल्याने संशयितांना काही रक्कम परत केली होती. मात्र, तोच प्रकार वारंवार घडू लागल्याने स्टेट बँकेच्या अधिका-यांना संशय आला. त्यांनी एटीम मशीन मधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मात्र, तोपर्यंत बरीच रक्कम बँकेच्या खात्यातून हडप झाली होती.

याप्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यव्यस्थापक संजय तुकाराम गव्हाणे (रा. गोलबागेजवळ, राजवाडा,सातारा) यांनी अज्ञात चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करत आहेत.

या एटीएम मशीनमधील रोकड गायब..

सातारा शहरात असलेल्या स्टेट बँकेच्या अहिरे कॉलनी येथील दोन, बारावकरनगर येथील दोन, एमआयडीसीतील एक, समर्थ मंदिर येथील दोन, दुर्गापेठेतील एक, सदरबझार येथील एक, नगरपालीकेजवळील एक, गोडोली येथील दोन, शाहूनगर येथील दोन, शाहूपुरी येथील एक अशा एकूण पंधरा एटीम मशीनमधून ही २४ लाखांची रोकड काढली गेली आहे.

Web Title:  7 lakhs grabbed from 7 ATM centers in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.