प्रमुख धरणांमध्ये १२५ टीएमसी पाणीसाठा : उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 08:04 PM2020-01-15T20:04:45+5:302020-01-15T20:05:19+5:30
पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम
सातारा : जिल्'ात गेल्यावर्षी सतत पाच महिने झालेल्या पावसामुळे आजही सर्वच धरणात चांगला पाणीसाठा आहे. त्यातच अजूनही सिंचनासाठी मोठा पाणी वापर सुरू नाही. तर जिल्'ातील प्रमुख सहा धरणांची साठवण क्षमता १४८.७४ टीमएसी आहे. सद्य:स्थितीत या धरणातील साठा १२५.३५ टीएमसी आहे. हा साठा गतवर्षीपेक्षा जवळपास १७ टीएमसीने अधिक आहे. तर उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार आहे.
जिल्'ात २०१८ या वर्षात दुष्काळी स्थिती होती.
पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम म्हणून धरणातील साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे २०१९ मध्ये तरी पाऊस होणार का? अशी चिंता लागलेली. पण पावसाने धुवाँधार सुरुवात केली. पश्चिम भागात तर जुलैपासून सतत पाऊस राहिला. हा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे दोनवेळा जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली. कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. याचदरम्यान, पश्चिम भागातील सर्वच धरणे भरली होती. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत होता. परिणामी नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या.
पूर्व भागात खऱ्या अर्थाने आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. सुरुवातीला परतीचा पाऊस दमदार कोसळला. तर त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला अवकाळीने कहरच केला. यामुळे शेती पिके, फळबागा, घरांचे मोठे नुकसान झाले. नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही लांबल्या. अशा या पार्श्वभूमिवर जिल्'ात अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी नाही. त्यामुळे धरणात चांगला पाणीसाठा टिकून आहे.
जिल्'ातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी या धरणात १०८.४३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो १५ जानेवारीला १२५.३५ टीएमसी इतका आहे. म्हणजेच सततच्या पावसामुळे पाणीसाठा टिकून असून, गतवर्षीपेक्षा तो १७ टीएमसीने अधिक आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाºया कोयना धरणातही अजून ८५.९० टीएमसी साठा आहे. तर धोम, कण्हेर, बलकवडी, उरमोडी आणि येरळवाडीतही चांगला पाणीसाठा आहे. सध्या कण्हेर धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू करण्यात आला आहे.
उन्हाळा सुरू झाल्यानंतर पिकांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येते. त्यासाठी कण्हेर, उरमोडी, कोयना, धोम अशा सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. सध्या पाणीसाठा चांगला असल्याने शेतीसाठी टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे.
जिल्'ातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)
धरणे यावर्षी गतवर्षी एकूण क्षमता
धोम ११.०७ ७.७५ १३.५०
कण्हेर ८.६९ ७.५५ १०.१०
कोयना ८५.९० ८०.१६ १०५.२५
बलकवडी ४.०३ २.०६ ४.०८
उरमोडी ९.७७ ५.१८ ९.९६
तारळी ४.७६ ४.६८ ५.८५
येरळवाडी १.१३ ०.५१ १.१५
....................................................