जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 AM2021-02-20T05:51:22+5:302021-02-20T05:51:22+5:30
सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना बळींची संख्या वाढत होती. मात्र, शुक्रवारी एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे ...
सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना बळींची संख्या वाढत होती. मात्र, शुक्रवारी एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सायंकाळी नवे ७० रुग्ण आढळल्यामुळे बाधितांची संख्या ५७ हजार ८८० इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी रात्री ७७ रुग्ण आढळले होते. यामध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबतही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात ३३ तर आतापर्यंत ५५,०४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ७१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.