सातारा घंटागाडीत ७० टक्के प्लास्टिकच ! पिशव्या फेकून देण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:06 PM2018-06-25T22:06:31+5:302018-06-25T22:07:37+5:30

प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा करणाºया व्यापाºयांवर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची धास्ती घेत शहरातील अनेक व्यापारी व दुकानदारांनी आपल्याकडील

70 percent plastic in Satara Ghaggati! Fill the bags thrown on | सातारा घंटागाडीत ७० टक्के प्लास्टिकच ! पिशव्या फेकून देण्यावर भर

सातारा घंटागाडीत ७० टक्के प्लास्टिकच ! पिशव्या फेकून देण्यावर भर

Next

सातारा : प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा करणाºया व्यापाºयांवर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची धास्ती घेत शहरातील अनेक व्यापारी व दुकानदारांनी आपल्याकडील प्लास्टिक पिशव्या व इतर वस्तूंची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. घंटागाडीच्या माध्यमातून सोनगाव कचरा डेपोत साचणाºया कचºयात सुमारे ७० टक्के कचरा हा प्लास्टिकचा असल्याची माहिती समोर आली आहे.

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे सातारकरांमधून स्वागत करण्यात आले. नागरिकांनी बंदीच्या पहिल्याच दिवसापासून स्वत:हून प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केले आहे. प्लास्टिकऐवजी आता कापडी पिशव्यांना मागणी वाढली असून, दुकानदार तसेच व्यावसायिकांनीही प्लास्टिकला पर्याय म्हणून कादगी व कापडी पिशव्यांनाच पसंती दिली आहे.दरम्यान, बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करणाºयांवर पालिकेच्या आरोग्य पथकाच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईची धास्ती घेत नागरिकांसह छोटे-मोठे दुकानदार, कापड व्यापारी, व्यावयिकांनी प्लास्टिक पिशव्या स्वत:च हद्दपार केल्या आहे. सकाळी कचरा उचलण्यासाठी येणाºया घंडागाडीत प्लास्टिक पिशव्यांचाच जास्त भरणा होत आहे. या घंटागाड्यांमधील कचरा सोनगाव डेपोत टाकला जातो. या ठिकाणी गेल्या दोन-तीन दिवसांत साचलेल्या कचºयात तब्बल ७० टक्के कचरा हा प्लास्टिकचा असल्याची माहिती येथील कर्मचाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

निर्जनस्थळी साचू लागले ढीग..
प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावण्यासांठी नागरिकांनी पुढाकार घेतला असला तरी काही व्यापारी व दुकानदार मात्र अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा चोरून वापर करीत आहेत. तर काही व्यापारी कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून रात्रीच्या वेळी प्लास्टिक पिशव्या व इतर वस्तू निर्जनस्थळी आणून टाकत आहे.


पिशव्या चार किलो अन् दंड दहा हजार
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदार व व्यापाºयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी या मोहिमेच्या दुसºया दिवशी पालिकेने सदाशिव पेठेतील दोन व्यापाºयांकडून सुमारे चार किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तसेच संबंधितांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंडही वसूल केला.
प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर पालिकेच्या वतीने शहरात दुकानदार, व्यापारी व लहान-मोठ्या व्यावसायिकांची तपासणी सुरू केली आहे. शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईत पालिकेच्या पथकाने आठ व्यावसायिकांडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून प्रत्येकी पाच हजार असा एकूण चाळीस हजारांचा दंडही ठोठावला होता.
सोमवारी कारवाईच्या दुसºया दिवशी या पथकाने सदाशिव पेठेतील अभी व्हरायटीजचे मालक जी. डी. दोशी व नवरंगचे मालक सुरेश लावंघरे यांच्याकडून सुमारे चार ते पाच किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंडही ठोठावला. मंगळवारी ही मोहीम आणखीन तीव्र करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे राजेंद्र कायगुडे यांनी दिली.

पार्सलसाठी हॉटेलात भाड्याने स्टीलचे डबे
१. प्लास्टिक बंदीचा खाद्यपदार्थांच्या पार्सलवर चांगलाच परिणाम झाला आहे. यामुळे ग्राहकांची संख्या देखील कमी होत चालली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता हॉटेल व्यावसायिक नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत. एका व्यावसायिकाने निमय व अटीनुसार ग्राहकांना पार्सलसाठी चक्क स्टीलचे डबे उपलब्ध करून दिले आहेत.
२. विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक नागरिक हॉटेलमधून तयारच पदार्थ घरी घेऊन जाणे पसंत करतात. साताºयातील चौपाटी असो की शहरातील विविध हॉटेल्स असो ग्राहकांना आतापर्यंत या वस्तू प्लास्टिक पिशवीतून पार्सल दिल्या जात होत्या. मात्र, प्लास्टिक बंदीनंतर याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला. मात्र, स्वस्थ न बसता काही व्यावसायिकांनी तातडीने या समस्येवर उपाय शोधून काढला आहे.
३. खवय्यांचे चोचले पुरविण्यासाठी या हॉटेल व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशवी ऐवजी आता स्टीलचे डबे उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. पार्सलसाठी हे डबे उपलब्ध करून देताना डब्याची अनामत रक्कम ग्राहकांना जमा करावी लागणार आहे. डबा दिल्यानंतर रक्कम ग्राहकांना परत दिली जाणार आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली असली तरी कालांतराने ग्राहक स्वत:चा डबा घेऊन येतील. ग्राहकांना सवय लागेपर्यंत डब्याची ही सेवा सुरू ठेवणार आहे.
- मुख्तार पालकर, हॉटेल व्यावसायिक

पत्रावळ्या अन् द्रोणचं पुनरुज्जीवन
राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध प्रकारच्या प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यात प्लास्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण तसेच ग्लास आदींची विक्री करणाºया व्यापारांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
लग्न समारंभात तसेच इतर कार्यक्रमातही पत्रावळ्या, द्रोण तसेच प्लास्टिकच्या ग्लासेसना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, प्लास्टिक बंदीनंतर यावरही निर्बंध आल्यामुळे कागदी आणि झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या आणि द्रोणला मागणी वाढणार आहे.
प्लास्टिकबंदी लागू करण्यात आल्याने प्लास्टिक पत्रावळ्या, द्रोण, ग्लास या वस्तूंवरही याचा १०० टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच व्यापारी कागदी व झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या आणि द्रोणची विक्री करताना दिसून येत आहेत.
 

प्लास्टिक बंदीचा परिणाम आमच्या व्यवसायावरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आमच्याकडील शिल्लक असलेल्या प्लास्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लासेस पालिकेने जमा करून घेतल्या आहेत. त्यामुळे आमचे नुकसान झाले आहे. आता यापुढे आम्ही कागदी व झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या आणि द्रोण विक्रीसाठी ठेवणार आहोत.
- रवी कांबळे, व्यावसायिक

Web Title: 70 percent plastic in Satara Ghaggati! Fill the bags thrown on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.