कोरेगाव तालुक्यात ७१ महिला सरपंच

By Admin | Published: April 1, 2015 09:53 PM2015-04-01T21:53:20+5:302015-04-02T00:47:57+5:30

महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण : खुल्या प्रवर्गासाठी ४६ तर मागास प्रवर्गासाठी १९ ग्रामपंचायती

71 women Sarpanchs in Koregaon taluka | कोरेगाव तालुक्यात ७१ महिला सरपंच

कोरेगाव तालुक्यात ७१ महिला सरपंच

googlenewsNext

कोरेगाव : तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. खुल्या प्रवर्गासाठी ४६ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ४६, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुषांसाठी १९ आणि महिलांसाठी १९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित राहिले आहे. अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीतील पुरुषासाठी पाच आणि अनुसूचित जातीतील महिलेसाठी सहा ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तहसीलदार अर्चना तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवासी नायब तहसीलदार निवास ढाणे, नायब तहसीलदार दिलीप मोरे, रवींद्र रांजणे, श्रीरंग मदने, दिलारबी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय सभागृहात सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रारंभी तांबे व ढाणे यांनी आरक्षण सोडतीमागील शासनाची भूमिका स्पष्ट केली. सर्वात प्रथम कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबतची माहिती देण्यात आली. अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आल्याचे तांबे यांनी जाहीर केले.
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण व गावांची नावे पुढीलप्रमाणे, सर्वसाधारण खुला प्रवर्ग - हिवरे, रणदुल्लाबाद, सर्कलवाडी, विखळे, कण्हेरखेड, त्रिपुटी, वाठार स्टेशन, वेलंग (शिरंबे), एकसळ, अरबवाडी, तांबी, दरे, शेल्टी, वेलंग (कण्हेरखेड), चिलेवाडी, पळशी, अनपटवाडी, नागझरी, बनवडी, रुई, नागेवाडी, भक्तवडी, भाडळे, कोंबडवाडी, बेलेवाडी, वाघोली, तळिये, पेठ किन्हई, गुजरवाडी (पळशी), मोरबेंद, जळगाव, आसरे, किरोली, बर्गेवाडी, भीमनगर, सिद्धार्थनगर, जरेवाडी, परतवडी, सोनके, भोसे, चिमणगाव, खेड, जायगाव, भावेनगर, भाकरवाडी, भाटमवाडी या गावांचा समावेश आहे.
सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला- रेवडी, सातारारोड, दुर्गळवाडी, साठेवाडी, साप, चोरगेवाडी, मदनापूरवाडी, न्हाळेवाडी, पवारवाडी, अनबलवाडी, अपशिंगे, कठापूर, बोधेवाडी (भाडळे), भंडारमाची, तडवळे संमत वाघोली, आसगाव, चांदवडी, अंबवडे संमत कोरेगाव, न्हावी बुद्रुक, मंगळापूर, तांदूळवाडी, बोरजाईवाडी, घाडगेवाडी, टकले, बोधेवाडी (चिमणगाव), नलवडेवाडी (बिचुकले), तडवळे संमत कोरेगाव, वडाचीवाडी, वेळू, नायगाव, रिकिबदारवाडी, बोरगाव, किन्हई, दहिगाव, गुजरवाडी (टकले), गोगावलेवाडी, दुधनवाडी, बिचुकले, होलेवाडी, शेंदूरजणे, पिंपरी, जांब बुद्रुक, देऊर, सायगाव (धामणेर), सोळशी, कवडेवाडी या गावांचा समावेश आहे.
या आरक्षण सोडतपद्धतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. (प्रतिनिधी)


फडतरवाडी विभाग
अनुसूचित जमाती पुरुष- चवणेश्वर.
अनुसूचित जाती पुरुष- पिंपोडे बुद्रुक, जांब खुर्द, अंबवडे संमत वाघोली, निगडी, नांदवळ.
अनुसूचित जाती महिला प्रवर्ग- कोरेगाव, दुघी, सासुर्वे, ल्हासुर्णे, सायगाव (एकंबे), खिरखिंडी. या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.



मागासप्रवर्ग पुरूष
नागरिकांसाठी मागासप्रवर्ग पुरुष-चंचळी, पिंपोडे खुर्द, बोबडेवाडी, काळोशी, तारगाव, करंजखोप, आसनगाव, गोडसेवाडी, जाधववाडी, खामकरवाडी, एकंबे, अंभेरी, धुमाळवाडी, भिवडी, न्हावी खुर्द, राऊतवाडी, शिरंबे, सांगवी, कोलवडी.
नागरिकांसाठी मागासप्रवर्ग महिला राखीव- कुमठे, शिरढोण, नलवडेवाडी (तारगाव), आर्वी, मोहितेवाडी, खडखडवाडी, मुगाव, धामणेर, वाघजाईवाडी, सुलतानवाडी, रामोशीवाडी, सुर्ली, हासेवाडी, वाठार (किरोली), घिगेवाडी, जगतापनगर, चौधरवाडी, गोळेवाडी, फडतरवाडी या गावांचा समावेश आहे.

Web Title: 71 women Sarpanchs in Koregaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.