जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींचे धूमशान
By admin | Published: June 25, 2015 12:59 AM2015-06-25T00:59:18+5:302015-06-25T01:01:09+5:30
जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींचे धूमशान कार्यक्रम जाहीर : ४ आॅगस्ट रोजी होणार मतदान
सातारा : सातारा जिल्ह्यातील ७११ सार्वत्रिक व १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, आचारसंहिताही लागू झाली आहे. ४ आॅगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे.
सातारा तालुक्यात संगम माहुली, निसराळे, सासपडे, परळी, फत्यापूर, गजवडी, शेंद्रे, वळसे, कण्हेर, यवतेश्वर, भोंदवडे, विलासपूर, खेड, संभाजीनगर, अंबवडे खुर्द, कोरेगाव तालुक्यातील रेवडी, किन्हई, वाठार स्टेशन, अंबवडे सं. वाघोली, भक्तवडी, नांदवळ, दहिगाव, धामणेर, साप, तारगाव, जावळी तालुक्यातील कुडाळ, सायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, दरे खुर्द, हुमगाव, कऱ्हाड तालुक्यातील तासवडे, चोरे, उंडाळे, पाडळी केसे, पाल, घोगाव, वडगाव उंब्रज, पेरले, वहागाव, विंग, इंदोली, खोडशी, जिंती, बनवडी, कार्वे, टाळगाव, काले, किरपे, कोडोली, वारुंजी, म्हासोली, नांदगाव, गोटे, मुंढे, घोणशी, पारले, सैदापूर, निगडी, गोवारे, साजूर, कोळे, शणोली, शेरे, मरळी, भुयाचीवाडी, वडोली निळेश्वर, नांदलापूर, चचेगाव, वराडे, सुर्ली, ओंड, वसंतगड, येणपे, हजारमाची. पाटण तालुक्यातील नाडोली, अटोली, वाजोली, बोडकेवाडी, नावडी, धावडे, काळणे, बोंद्री, नेरणे, गोषटवाडी, चाफोली, पापरडे खुर्द, जरेवाडी, वांझोळे. वाई तालुक्यातील अनवडी, मेणवली, बावधन, चांदक, बोपेगाव, पसरणी, सुरूर, धोम, उडतारे, विरमाडे, वरखडवाडी, व्याजवाडी. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार, क्षेत्र महाबळेश्वर, माचुतर, खिंगर. खंडाळा तालुक्यातील खंडाळा, नायगाव, अतीट, पळशी, अहिरे, पारगाव, अंदोरी तसेच फलटण तालुक्यात कोरेगाव, निरगुडी, राजाळे, राजुरी, हिंगणगाव, जिंती, कापशी, कोळकी. खटाव तालुक्यातील कातरखटाव, निढळ, चितळी, निमसोड, पळशी, पुसेगाव, पुसेसावळी, कलेढोण, विसापूर. माण तालुक्यातील गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, कुळकजाई, मार्डी, दहिवडी या ग्रामपपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)