सातारा पोलिसांची ७२ मुलं रमली हक्काच्या पब्लिक स्कूल शाळेत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:35 AM2018-04-10T00:35:49+5:302018-04-10T00:37:08+5:30
सातारा : पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची दर तीन वर्षांनी बदली होते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शाळांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.
स्वप्नील शिंदे ।
सातारा : पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची दर तीन वर्षांनी बदली होते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शाळांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हे थांबवण्यासाठी पोलीस मुख्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या सातारा पोलीस पब्लिक स्कूलमध्ये सोमवारपासून किलबिल सुरू झाली आहे. त्यामुुळे पोलिसांच्या मुलांना आता हक्काची शाळा मिळाली आहे. येथे ७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
जिल्हा पोलीस आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कºहाड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी क्लबशेजारी जुन्या पोलीस इन्स्पेक्टर निवासस्थानात सातारा पोलीस व पब्लिक स्कूल सुरू करण्यात आले. मार्च महिन्यापासून शाळेच्या प्रवेशाला सुरुवात झाली होती. ही इंग्रजी माध्यमाची सीबीएससी पॅटर्नची शाळा असून, या शाळेत सध्या नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी आणि फस्ट स्टॅन्डर्टची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या शाळेत ५० टक्के पोलीस कर्मचाºयांच्या मुलांना तर ५० टक्के सर्वसामान्य लोकांच्या मुलांना आरक्षण देण्यात आले आहे. आजअखेर ७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामध्ये ७० पोलीस कर्मचारी व दोन अधिकाºयांच्या मुलांनी प्रवेश घेतला.
पोलिसांच्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पोलिसांच्या मुलांना हक्काची शाळा मिळाली.
- राजलक्ष्मी शिवणकर पोलीस उपअधीक्षक
फीमध्ये सवलत...
पोलीस कर्मचाºयांना फीमध्ये ५० टक्के सवलत
पोलिस पाल्य ५० व सर्वसामान्यांच्या पाल्यांसाठीही ५० टक्के सवलत
उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट या नामांकित शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन
वाहतुकीसाठी बसची सुविधा