सर्वात वाईट वर्ष : ७२ वर्षांत लालपरीची चाकं ७७ दिवस थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 03:35 PM2020-05-31T15:35:56+5:302020-05-31T15:43:59+5:30

दसरा, दिवाळी असो व कोणताही सण बारा महिने, चोवीस तास धावत असलेल्या एसटीची चाकं कोरोनामुळे थांबली आहेत. २१ मार्चला जनता कर्फ्यू जाहीर झाला होता. तेव्हापासून एसटी धावलीच नाही.

In 72 years, the wheel of the red fairy stopped for 77 days | सर्वात वाईट वर्ष : ७२ वर्षांत लालपरीची चाकं ७७ दिवस थांबली

सर्वात वाईट वर्ष : ७२ वर्षांत लालपरीची चाकं ७७ दिवस थांबली

Next
ठळक मुद्देदररोज कोटींचं उत्पन्न मिळविणा-या एसटीचे मीटर डाऊन

जगदीश कोष्टी
सातारा : दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणारी सर्वसामान्यांची एसटी सोमवारी ७२ वर्षांची होत आहे. दरवर्षी १ जून हा एसटीचा स्थापन दिवस धूमधडाक्यात साजरा केला जातो; पण एसटीच्या या वाटचालीत २०२० हे काळे वर्ष ठरले आहे. या प्रवासात प्रथमच तब्बल ७७ दिवस गाड्यांची चाकं जागेवर थांबली आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीनं प्रत्येक खेड्यापाड्यांना आपल्या नकाशावर आणले आहे. जावळीतील घनदाट खोरं, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांतील दºयाखोºयांतील गावांमध्ये एसटी पोहोचली आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी साता-यासह तालुक्यांच्या ठिकाणी येणाºया विद्यार्थ्यांसाठी एसटीच मोठा आधार होता.

सातारकरांचे पुणे, मुंबईशी जवळचे नाते आहे. घरटी एकजण तरी शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईत राहत आहे. सातारकरांची हीच गरज लक्षात घेऊन एसटीने पुणे, मुंबईला विनाथांबा गाड्या सुरू केल्या. त्यांना सातारकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर एसटीने या मार्गावर फेºया वाढवल्या आहेत. त्यातून एसटीला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत होता.

खासगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्यांशी स्पर्धा करत असताना एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शिवशाही गाड्या दाखल झाल्या. त्यांचा दर, वारंवार होणारे अपघात यामुळे या गाड्या नेहमीच चर्चेत राहिल्या असल्या तरी आयटी क्षेत्रात, उच्च पदस्थ लोकांसाठी शिवशाहीचा प्रवास नेहमीच आपला वाटला आहे. यामुळे तोट्यातील एसटीला नवसंजीवनी मिळण्यास निश्चितच मदत होत होती.

दसरा, दिवाळी असो व कोणताही सण बारा महिने, चोवीस तास धावत असलेल्या एसटीची चाकं कोरोनामुळे थांबली आहेत. २१ मार्चला जनता कर्फ्यू जाहीर झाला होता. तेव्हापासून एसटी धावलीच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात घट झाली आहे. हीच तूट भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने माल वाहतुकीसाठी मार्गही निवडला आहे. तो यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत; पण २०२० वर्ष मात्र कधीच ते विसरू शकणार नाहीत.

कर्मचा-यांवर वेतनाची तलवार
एसटीचं उत्पन्नचं थांबलं असल्याने कर्मचाºयांच्या डोक्यावर कायमच पगाराची टांगती तलवार आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर केवळ पगाराच्या विषयावरच चर्चा होत असते. 

Web Title: In 72 years, the wheel of the red fairy stopped for 77 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.