कृष्णामाईला ७५० मीटरची साडी, प्रीतिसंगमावर सोहळा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 04:56 AM2017-09-13T04:56:49+5:302017-09-13T04:56:49+5:30

येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पार पडली. सकाळी नऊच्या सुमारास कृष्णामाईला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी विधीवत नेसविण्यात आली. हजारो भाविकांनी नदीच्या पैलतीरी थांबून हा सोहळा पाहिला.

 750 meter sari of Krishnamami, celebrations on Pratiyansamma | कृष्णामाईला ७५० मीटरची साडी, प्रीतिसंगमावर सोहळा  

कृष्णामाईला ७५० मीटरची साडी, प्रीतिसंगमावर सोहळा  

Next

क-हाड (जि. सातारा) : येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पार पडली. सकाळी नऊच्या सुमारास कृष्णामाईला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी विधीवत नेसविण्यात आली. हजारो भाविकांनी नदीच्या पैलतीरी थांबून हा सोहळा पाहिला.
१२५ साड्यांची एकमेकांना गाठ बांधून ही ७५० मीटर लांबीची साडी तयार करण्यात आली होती. साडी नेसविण्यासाठी पालिकेच्या वतीने बोटीचीही सोय करण्यात आली होती. यावेळी पालिकेतील अग्नीशामक दलातील कर्मचा-यांनी कन्यागत समितीतील पदाधिकारी, महिला भाविकांना बोटीतून कृष्णा नदीपात्रापासून सैदापूर येथील नदीपात्रातील पाऊण किलोमीटर अंतरावर पूजनासाठी नेले.
यावेळी नेसविण्यात येणाºया साडीचे एक टोक सैदापूर नदीपात्राकाठी ठेवले. तेथून परत क-हाडच्या कृष्णानदीकाठावर साडीचे दुसरे टोक आणले.
त्यानंतर भाविकांनी नदीची पूजा करून दीपप्रज्वलन करून आरतीही केली. तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाºया कºहाडला गेली वर्षभर कन्यागत पर्वाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले. त्याची सांगता मंगळवार झाली.
 

Web Title:  750 meter sari of Krishnamami, celebrations on Pratiyansamma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी