Lok Sabha Election 2019 १०३ पैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट निवडणुकीत जप्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:08 PM2019-04-11T23:08:15+5:302019-04-11T23:08:34+5:30

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आदींनी केले ...

76 out of 103 deposited in depository elections ... | Lok Sabha Election 2019 १०३ पैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट निवडणुकीत जप्त...

Lok Sabha Election 2019 १०३ पैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट निवडणुकीत जप्त...

Next

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आदींनी केले असून, गेल्या १३ निवडणुकींत १०३ उमेदवारांनी निवडणूक लढवून नशीब अजमावले. त्यापैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
१९९५१ मध्ये सातारा उत्तर मतदार संघातून चौघेजण निवडणुकीत उभे राहिले होते. त्यापैकी एकाचे डिपॉझिट जप्त झाले. १९५७ ला सातारा मतदारसंघ झाला, त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ६५.४२ टक्के मते घेत विजय मिळविला होता. १९६७ ला प्रथमच यशवंतराव चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात दोन उमेदवार उभे होते. त्यापैकी एकाचे डिपॉझिट जप्त झाले. १९७१, ७७ आणि ८० च्या लोकसभा निवडणुकीतही चव्हाण यांनी विजय मिळवला. १९८९ च्या निवडणुकीत १३ उमेदवार होते. त्यामध्ये काँग्रेसचे प्रतापराव भोसले यांनी तब्बल ८१.९४ टक्के मते घेत १२ जणांचे डिपॉझिट जप्त केले.
२०१४ च्या मोदी लाटेत उदयनराजे भोसले यांच्याह १८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १७ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणाऱ्यांची ही संख्या सर्वाधिक ठरली.

निवडणूक एकूण डिपॉझिट
वर्ष उमेदवार जप्त झालेले
१९६७ ३ १
१९७१ ३ १
१९७७ ४ २
१९८० ८ ६
१९८४ ८ ६
१९८९ १३ १२
१९९१ १० ८
१९९६ १६ १३
१९९८ २ ०
१९९९ ६ ३
२००४ ६ ४
२००९ ५ ३
२०१४ १९ १७
एकूण १०३ ७६

डिपॉझिट वाचविण्यासाठी किती मते लागतात?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

Web Title: 76 out of 103 deposited in depository elections ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.