‘सह्याद्री’साठी ७७ टक्के मतदान

By admin | Published: March 17, 2015 10:49 PM2015-03-17T22:49:46+5:302015-03-18T00:07:36+5:30

अनेकांनी बजाविला हक्क : मतमोजणी दिवशी वाहतुकीत तात्पुरता बदल

77 percent polling for 'Sahyadri' | ‘सह्याद्री’साठी ७७ टक्के मतदान

‘सह्याद्री’साठी ७७ टक्के मतदान

Next

कऱ्हाड : यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. कार्यक्षेत्रातील ९९ मतदान केंद्रांवर सरासरी ७७.८ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
कऱ्हाड, सातारा, कोरेगाव, खटाव हे सातारा जिल्ह्यातील चार तालुके व सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा तालुका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो. सह्याद्रीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यापासुन कार्यक्षेत्रात प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. मंगळवारी २१ जागांसाठी कार्यक्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पाच तालुक्यातील ९९ मतदान केंद्रावर सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका मतदाराला २१ मते द्यावी लागल्याने मतदान प्रक्रीयेसाठी वेळ लागला. कऱ्हाडसह, तांबवे, करवडी, म्होप्रे, बेलवडे, तासवडे, उंब्रज, कोर्टी, कोपर्डे हवेली, तळबीड, चचेगाव, ओगलेवाडी, पार्ले, पुसेसावळी, तारगाव, वाठार किरोली, साप, रहिमतपूर आदी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रांवरील मतपेट्या सिल करून कऱ्हाड येथील भेदा चौकातील गोडाऊनमध्ये आणण्यात आल्या.
या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, ४९५ मतदान अधिकारी, ९९ मतदान कर्मचारी असे एकुण ६९३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
कोपर्डे हवेली मतदान केंद्रावर १ हजार १५७ पैकी ९९८ (८६.२५ टक्के ), वडोली निळेश्वर येथे ३८० पैकी २६६ (९० टक्के), पार्ले (९३ टक्के), नडशी येथे ३६२ पैकी ३३४ तर शिरवडे येथे ८२ टक्के, तसेच तांबवे मतदान केंद्रावर १ हजार ५७७ पैकी ११५२ (७३ टक्के), म्होप्रेत ३६९ पैकी २५८ (७० टक्के), बेलदरे येथे २९१ पैकी १८३ (६३ टक्के), वस्ती साकुर्डी ३१७ पैकी २३१ (७२.६४ टक्के), वसंतगड ४५७ पैकी ३३२ (७२.६६ टक्के) आदी मतदान झाले. (प्रतिनिधी)

कऱ्हाडात गुरुवारी मतमोजण
कऱ्हाड येथे भेदा चौकातील शासकिय गोडाऊनमध्ये उद्या (गुरूवार) मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असुन गोडाऊन परीसरात दोन्ही पॅनेलच्या समर्थकांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीमुळे गुरूवारी शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

Web Title: 77 percent polling for 'Sahyadri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.