महाबळेश्वर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींत ७७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:54+5:302021-01-16T04:43:54+5:30
तीन गावांतील मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला होता. महसूल विभागाने तत्काळ मतदान यंत्रे बदलली. त्यानंतर त्या गावातील मतदान प्रक्रिया ...
तीन गावांतील मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला होता. महसूल विभागाने तत्काळ मतदान यंत्रे बदलली. त्यानंतर त्या गावातील मतदान प्रक्रिया पार पडली.
तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध पार पडल्या. उरलेल्या १४ ग्रामपंचायतींपैकी पाच गावांसाठी पूर्ण तर ९ गावांच्या अंशतः जागांसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये ३० वार्डांतून ४९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले.
प्रारंभी वेगाने मतदान सुरू झाले. त्यानंतर मतदानाचा वेग मंदावला. सकाळी साडेअकरापर्यंत तालुक्यातील ३९ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता तर सायंकाळी मतदानाची वेळ संपली तेव्हा तालुक्यातून ७ हजार १२७ मतदारांपैकी ७७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.
क्षेत्र महाबळेश्वरात सर्वाधिक
भिलार येथे ८३.३७ टक्के मतदान झाले. राजपुरीत ६०.४५, आंब्रळमध्ये ७९.०१, कोट्रोशीमध्ये ७९.०९, आकाल्पेत ७५.५४, वाळणेत ६९.४४, क्षेत्र महाबळेश्वर ८६.६३, खिंगर ६६.७८, सौंदरीमध्ये ७५.४४, दांडेघरला ८३.३७, कासवंडमध्ये ८२.०१, गोडवली ७१.०७, कुरोशीत ७७.०७, कुंभरोशीत - ७५.५९%