साताऱ्यात ९ आॅगस्टला विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:27 PM2019-08-03T12:27:28+5:302019-08-03T12:30:24+5:30
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ आॅगस्ट रोजी सहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ आॅगस्ट रोजी सहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोकडे म्हणाले, विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन हे एकदिवशीय आहे. या संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. अरुण आंधळे, डॉ. रामचंद्र देखणे, प्रा. डॉ. भाऊसाहेब कराळे, चंद्रकांत वानखडे, प्रा. अशोककुमार पगारिया यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी २ वाजता प्रबोधनयात्री कविसंमेलन, प्रबोधनयात्री पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे.
संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची प्रकट मुलाखत डॉ. शिवलिंग मेनकुदळे घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ४.३० ला रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीदूत पुरस्कार तर प्रा. डॉ. भाऊसाहेब कराळे यांना आदर्श रयत सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता रयतच्या मुख्य कार्यालय ते वायसी कॉलेजपर्यंत बंधुता दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अरुण आंधळे, चंद्रकांत वानखेडे, महेंद्र भारती, गजानन भोसले आदी उपस्थित होते.