कऱ्हाडला ८० हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:06+5:302021-07-18T04:28:06+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड येथे पक्ष्यांचा पिंजरा घेण्यासाठी आलेल्या महिलेने व तिच्यासोबत असलेल्या मुलींनी दुकानदाराने ठेवलेल्या पैशाच्या बॅगवर डल्ला मारून ...

80,000 stolen from Karhad | कऱ्हाडला ८० हजारांची चोरी

कऱ्हाडला ८० हजारांची चोरी

googlenewsNext

कऱ्हाड : कऱ्हाड येथे पक्ष्यांचा पिंजरा घेण्यासाठी आलेल्या महिलेने व तिच्यासोबत असलेल्या मुलींनी दुकानदाराने ठेवलेल्या पैशाच्या बॅगवर डल्ला मारून त्यातील रोख ८० हजार रुपये लंपास केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबतची फिर्याद अल्ताफ हुसेन युसूफ मुतवल्ली (वय ५२, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) यांनी शहर पोलिसांत दिली असून, याप्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुतवल्ली यांचे गुरुवार पेठ येथे कोयना दूध शॉपी नावाचे दुकान आहे. ते सदर दुकानामध्ये दुग्धजन्य पदार्थ व पाळीव पक्ष्यांचे पिंजरे विकतात. मागील चार दिवसांपूर्वी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी तीन दिवसांपासून साठलेल्या पैशाचा भरणा करण्यासाठी तीन लाख ४० हजार रुपये एकत्र करून एका बॅगेत दुकानात ठेवले होते. त्यावेळी दुकानात पिंजरा घेण्यासाठी एक महिला व तिच्यासोबत तीन मुली आल्या. त्या महिलेने पाळीव पक्ष्यांचा पिंजरा मागितला. त्यावेळी मुतवल्ली पिंजरा आणण्यासाठी दुकानात गेले व पिंजरा घेऊन त्या महिलेला दाखविला. त्या महिलेने पिंजरा आवडला नाही म्हणून पिंजरा नको म्हणून दुकानातून गेली. त्यावेळी मुतवल्ली पैशाची ठेवलेली बॅग बँकेत भरणा करण्यासाठी निघाले असता त्यांच्या लक्षात आले की, बॅगेत पैसे कमी आहेत म्हणून त्यांनी बॅगेतील पैसे मोजून पाहिले असता बॅगेतील रोख ८० हजार रुपये चोरीला गेले होते. त्यांनी बाहेर असणारे सीसीटीव्ही चेक केले असता समजले की, पिंजरा घेण्यासाठी आलेल्या महिलेसोबत असलेल्या मुलीने बॅगेतील रोख रकमेची चोरी केली आहे. याबाबत मुतवल्ली यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून या प्रकरणी महिलेसह मुलीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: 80,000 stolen from Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.