जिल्ह्यात तीन महिन्यांत ८१ लाख दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:39+5:302021-05-25T04:44:39+5:30

सातारा : मार्च २०२१ पासून गेल्या तीन महिन्यांत कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट लोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात विनामास्क फिरणा-या ...

81 lakh fines collected in three months in the district | जिल्ह्यात तीन महिन्यांत ८१ लाख दंड वसूल

जिल्ह्यात तीन महिन्यांत ८१ लाख दंड वसूल

Next

सातारा : मार्च २०२१ पासून गेल्या तीन महिन्यांत कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट लोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात विनामास्क फिरणा-या ३० हजार १०९ नागरिकांवर केसेस करून ८१ लाख ४७ हजार ६०० दंड वसूल केला.

मोटार वाहन कायदयाप्रमाणे ७९ हाजर ५२९ केसेस करून १ कोटी ९२ लाख ३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. १४ मे पासून जिल्हाधिकारी, सातारा यांच्या आदेशानुसार विनाकारण फिरणारे व ई-पासचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर २ हजार ९५९ केसेस व १९ लाख २० हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. लग्न समारंभ, मंगल कार्यालय या ठिकाणी गर्दी जमवल्याबाबत २५ केसेस मध्ये १ लाख ९४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: 81 lakh fines collected in three months in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.