सातारा शिक्षक बँकेसाठी दुपारपर्यंत ८१ टक्के मतदान

By दीपक देशमुख | Published: November 19, 2022 04:55 PM2022-11-19T16:55:33+5:302022-11-19T16:56:07+5:30

सातारा : शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या शिक्षक बँकेसाठी चुरशीने मतदान सुरू असून दुपारी दोन वाजेपर्यंत ७८८८ गुरुजींनी आपला मतदानाचा ...

81 percent polling till noon for Satara Teachers Bank | सातारा शिक्षक बँकेसाठी दुपारपर्यंत ८१ टक्के मतदान

सातारा शिक्षक बँकेसाठी दुपारपर्यंत ८१ टक्के मतदान

Next

सातारा : शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या शिक्षकबँकेसाठी चुरशीने मतदान सुरू असून दुपारी दोन वाजेपर्यंत ७८८८ गुरुजींनी आपला मतदानाचा हकक बजावला. यामध्ये सर्वाधिक वाई आणि परळी मतदान केंद्रांवर सर्वाधिक ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले. तर एकूण ८१ टक्के मतदान झाले.

शिक्षक बँकेचीनिवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीसाठी अखिल भारतीय शिक्षक संघ, शिक्षक समिती यांच्यासह स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलही निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. निवडणुकीत तीन पॅनेलचे एकूण ५९ उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार केला. त्यांचे भवितव्य आज, मतपेटीत बंद झाले. दि. २० रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टच्या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

असे झाले मतदान-

कऱ्हाड ८५.७१, कऱ्हाड ८०.२५, पाटण ९१.२८,  नागठाणे ८३.१०,  सातारा ७४.०८, परळी ९०.१२,  मेढा ८४.७०, महाबळेश्र्वर ८७.३७, वाई ९०.४८, भुईंज ८२.४६, खंडाळा ८१.२३, फलटण ७३.६१, फलटण ७७.११, कोरेगाव ७७.९५, रहिमतपूर ८३.८४, खटाव ८८.१३, मायणी ७५.५०, दहिवडी ८३.०२, म्हसवड ७२.७१ असे ८१.५८ टक्के मतदान झाले.

Web Title: 81 percent polling till noon for Satara Teachers Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.