फलटण तालुक्यात ८१.७४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:48+5:302021-01-16T04:43:48+5:30
तालुक्यात भाजपाने निर्माण केलेली चुरस, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटापुढे बंडखोरांनी निर्माण केलेले आव्हान, यामुळे अनेक ठिकाणी ही निवडणूक ...
तालुक्यात भाजपाने निर्माण केलेली चुरस, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटापुढे बंडखोरांनी निर्माण केलेले आव्हान, यामुळे अनेक ठिकाणी ही निवडणूक चुरशीची झाली. आता प्रतीक्षा आहे ती निवडणूक निकालाची.
फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी ५७४ जागांसाठी एकूण १,२५५ उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उभे होते. एक लाख १२ हजार २३० जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये ५८ हजार ८२८ पुरुष, तर ५३ हजार ४०२ महिला मतदारांचा समावेश आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे मतदानाचा हक्क बजाविला.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व युवा नेते सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथे मतदानाचा हक्क बजाविला. पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सोनगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत व चुरशीने मतदान झाले.
फोटो ओळ :
निंभोरे, ता. फलटण येथे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्वसाधारण मतदाराप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
फोटो ओळ :
कोळकी, ता. फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी मतदान केले.
फोटोनेम : १५नसीर०१,०२