जिल्ह्यात ८.२ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:26 AM2021-07-20T04:26:03+5:302021-07-20T04:26:03+5:30
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. रविवारी दिवसभर आणि सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ८.२ मिलिमीटर पाऊस पडला ...
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. रविवारी दिवसभर आणि सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ८.२ मिलिमीटर पाऊस पडला तर आतापर्यंत सरासरी ९०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा तालुका - ६.४ (२६०.९), जावळी - ९.४ (९१), पाटण - १०.३ (१०३.१), कऱ्हाड - ६.१ (५३.६), कोरेगाव - ५.१ (७१.९) मिलिमीटर, खटाव - ४.३ (३५.६), माण - ५.६ (११३.१), फलटण - १.८ (६४.२), खंडाळा - ०.५ (४१.२), वाई - १०.९ (९५.२) आणि महाबळेश्वर तालुक्यात ४९.९ (४९७.६) मिलिमीटर पाऊस पडला आहे.