जिल्ह्यातील रस्त्यांवर ८४ ठिकाणे अपघाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:21+5:302021-02-19T04:29:21+5:30

कऱ्हाड : जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू आणि गुहागर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेत. त्याचबरोबर अनेक राज्य मार्ग, जिल्हा मार्गांनी वाहतुकीचे जाळे ...

84 accidents on district roads | जिल्ह्यातील रस्त्यांवर ८४ ठिकाणे अपघाती

जिल्ह्यातील रस्त्यांवर ८४ ठिकाणे अपघाती

Next

कऱ्हाड : जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू आणि गुहागर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेत. त्याचबरोबर अनेक राज्य मार्ग, जिल्हा मार्गांनी वाहतुकीचे जाळे विणलेय. दररोज हजारो वाहनांची या रस्त्यांवरून वर्दळ होत असते; पण या प्रवासातच काहींना अपघाताचा सामना करावा लागतो.

अपघातांना कधी कधी वेळ कारणीभूत ठरते, तर बहुतांश वेळा ते ठिकाणच अपघाती असते. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात पाहणी केली आणि जिल्ह्यातील ८४ ठिकाणे अपघाती क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) म्हणून नोंदवली गेली.

अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर डिसेंबर २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून यासंदर्भात कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या उपाययोजना करण्यासंदर्भात राज्य शासनाला आदेश दिले होते. या आदेशानुसार इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती नेमण्यात आली. जिल्ह्यात ८४ ठिकाणे अपघाती आहेत, असा निष्कर्ष या समितीने नोंदवला. या निष्कर्षानुसार उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, त्या उपाययोजना कागदावरच राहिल्या असल्याचे दिसून येते. अनेक ‘ब्लॅक स्पॉट’वर अद्यापही प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस नवीन ठिकाणे अपघाती म्हणून समोर येत आहेत.

मुळातच जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा मजबूत आहे.

दोन राष्ट्रीय महामार्गांसह इतर राज्य आणि जिल्हा मार्गांनी प्रत्येक गाव एकमेकाशी जोडले गेले आहे. जिल्हा तसेच राज्य मार्ग पुढे राष्ट्रीय महामार्गांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे कित्येक किलोमीटरवरील शहरही खेड्यांसाठी लांब राहिलेले नाही. अवघ्या काही तासांच्या प्रवासात मोठमोठ्या शहरांपर्यंत ग्रामीण भागाला पोहोचणे शक्य झाले आहे. वाढती वाहनसंख्या, वाढणारे रस्ते आणि त्याबरोबरच आता वाहतुकीचा वेगही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटवर आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

चौकट

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट : ८४

२०२० मध्ये झालेले अपघात : ६५

अपघातामधील मृत : २५

चौकट

पुणे-बंगळुरू महामार्गावर गतवर्षातील अपघात

जानेवारी : २०

फेब्रुवारी : १३

मार्च : ७

एप्रिल : ३

मे : ७

जून : १

जुलै : १

ऑगस्ट : ३

सप्टेंबर : ४

ऑक्टोबर : ४

नोव्हेंबर : ११

डिसेंबर : ०

चौकट

दोन महिन्यांत दहा बळी

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे ते पेठनाका यादरम्यान जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये आजअखेर एकूण ११ अपघात झाले. त्यामध्ये दहा जणांना जीव गमवावा लागला. जानेवारी महिन्यात ११ तर फेब्रुवारीमध्ये आजअखेर ४ अपघात झाले आहेत.

चौकट

तालुकानिहाय ‘ब्लॅक स्पॉट’ची ठिकाणे

सातारा : २६

कऱ्हाड : २५

खंडाळा : १२

वाई : ८

फलटण : ४

कोरेगाव : ४

माण : २

पाटण : २

खटाव : १

महाबळेश्वर : ०

जावळी : ०

चौकट

या ठिकाणी गाडी जपून चालवा

शिरवळ फाटा, खंडाळा फाटा, वेळे खंबाटकी बोगदा, अनवडी फाटा, उडतारे, नागेवाडी फाटा, लिंब खिंड, म्हसवे शोरूम, वाढे, शिवथर थांबा, शेंद्रे फाटा, वाडेफाटा, चाहूर खेड फाटा, अजंठा चौक, शिवराज पंप, कोडोली देगाव फाटा, भरतगाव, वळसे, माजगाव, नागठाणे, बोरगाव, खोडद, रामकृष्ण नगर, काशीळ, अतित, कोर्टी फाटा, तारळी पूल वळण, मसूर फाटा, पेरले फाटा, बेलवडे फाटा, वराडे, एस वळण वहागाव, खोडशी, गोटे, कोल्हापूर नाका, मालखेड फाटा, पाचवड फाटा.

फोटो : १७केआरडी०७

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडनजीक वहागाव येथे ७ फेब्रुवारीला झालेल्या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. (छायाचित्र संग्रहित)

Web Title: 84 accidents on district roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.