इंद्रजित मोहितेंसह ८४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:02+5:302021-05-29T04:29:02+5:30
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित ...
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह ८४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आजअखेर ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवार (१ जून)पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जूनला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २५ मेपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ६ जणांनी तर गुरुवारी २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. मोहिते यांच्यासह कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष जगदीश जगताप तसेच काही माजी संचालकांचेही अर्ज दाखल झाले.
वडगाव हवेली - दुशेरे गटात १६, काले - कार्वे गटात १५, नेर्ले - तांबवे गटात १०, रेठरेहरणाक्ष - बोरगाव गटात १४, येडेमच्छिंद्र - वांगी गटात ६ तर रेठरे बुद्रुक - शेनोली गटात ६ उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल झाले. अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रवर्गातून तीन, महिला राखीवमधून ७ तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, आदी प्रवर्गातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले.
शुक्रवारी दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे : वडगाव हवेली-दुशेरे गट १ - बाबूराव जाधव (दुशेरे), श्रीरंग देसाई (आणे), विलास पाटील (येरवळे), राजेंद्र चव्हाण, विठ्ठल पाटील (कोळे), जयवंत गरूड (येणके), किसन देसाई (आणे), सुधीर जगताप, सुहास जगताप (वडगाव हवेली), आनंदा जगताप (कोडोली), अशोक जगताप, अभिजीत जगताप (वडगाव हवेली), आत्माराम देसाई (आणे), विजय जगताप, जगदीश जगताप (वडगाव हवेली), सयाजीराव पाटील (आटके), अजित पाटील (काले), निवासराव थोरात, दिग्वीजय थोरात (कार्वे).
काले - कार्वे गट २ - चंद्रकांत पाटील (काले), विशाल पाटील (कोडोली), प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, अमित काळे, विजयसिंह पाटील, राजेश जाधव, बाळासाहेब पाटील, रमेश जाधव, पोपटराव जाधव, संजय जाधव (आटके), उदयसिंह पाटील (आटके),
र्नेले - तांबवे गट ३ - जयवंत मोहिते (बेलवडे बुदुक), विलासराव पाटील, प्रशांत पाटील (नेर्ले), मनोहर थोरात (कालवडे), सुभाष पाटील, मनोज पाटील (र्नेले), गणेश पाटील (तांबवे), अनिल जगताप (येवलेवाडी), अशोक मोरे, विक्रमसिंह पाटील (तांबवे).
रेठरे हरणाक्ष - बोरगाव ४ - महेश पवार, सुभाष शिंदे (रेठरे हरणाक्ष), हणमंत पाटील (बहे), केदारनाथ शिंदे, विवेकानंद मोरे (रेठरे हरणाक्ष), लवाजीराव देशमुख, सयाजीराव पाटील (बहे), उदयसिंह शिंदे, जगन्नाथ पाटील (बोरगाव), अनिल पाटील, छाया पाटील (कामेरी), शिवाजी पवार (उरूण), विलास शिंदे (बोरगाव).
येडे मच्छिंद्र-वांगी गट ५ - सुरेश पाटील, संजय पाटील (येडेमच्छिंद्र), बापूसाहेब मोरे, राजाराम महिंद (देवराष्टे), भीमराव पाटील (येडेमच्छिंद्र), मुकुंद जोशी ( कुंडल), शिवाजी पाटील (येडेमच्छिंद्र), रेठरे बुद्रुक-शेणोली गट ६ - डॉ. इंद्रजित मोहिते (रेठरे बुद्रुक), रघुनाथ कदम (सोनसळ), बापूसाहेब पाटील (रेठरे खुर्द), आदित्य मोहिते (रेठरे बुद्रुक), अशोक पाटील (शेरे), अधिकराव निकम (शेरे), अनुसूचित जाती गट - अधिकराव भंडारी (टेंभू), सहदेव झिमरे (गोळेश्वर), धनाजी गोतपागर (कोडोली).
महिला राखीव - जयश्री पाटील (बहे), उषा पाटील (शेरे), सावित्री पाटील (बहे), सुरेखा पाटील (शिरटे), सत्वशिला थोरात (बहे), शुभांगी निकम (शेरे), विमुक्त जाती - आनंदराव मलगुंडे (कामेरी), दिलीप गलांडे (धोंडेवाडी).
फोटो
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी माजी अध्यक्ष डाॅ. इंद्रजित मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.