सातारा जिल्ह्यात ८४२ नवे संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:18+5:302021-08-01T04:36:18+5:30
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी १२ हजार १२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातून ८४२ नागरिक कोरोनाबाधित आढळले असून १६ बाधितांचा ...
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी १२ हजार १२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातून ८४२ नागरिक कोरोनाबाधित आढळले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी तब्बल ४१ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली होती. शनिवारी त्यात घट झाली.
सातारा तालुक्यात सर्वाधिक २०४ बाधित आढळले. कऱ्हाडात १७० तर फलटणमध्ये १०८ बाधित आढळून आले आहेत. माणमध्ये ८३, कोरेगावात ७२ लोकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जावली, महाबळेश्वर व पाटणमध्ये बाधितांची संख्या मर्यादित आहे. मात्र, इतर तालुक्यांतील रुग्णसंख्या कमी येताना दिसत नाही. जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख १९ हजार ९ लोक बाधित आढळून आले आहेत. तर २ लाख ५ हजार ५१८ लोक कोरोनामुक्त झाले.
कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये चढउतार पाहायला मिळतो. बुधवारी ४६ तर शुक्रवारी ४१ लोकांना जीव गमवावा लागला होता. शनिवारी मृत्यूंच्या संख्येत घट होऊन १६ मृत्यूंची नोंद झाली आहे. कऱ्हाडमध्ये २, खंडाळ्यात २, खटावात २, कोरेगाव, माणमध्ये प्रत्येकी १, पाटणमध्ये २, फलटणमध्ये ३, साताऱ्यात ३ अशा १६ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज अखेर जिल्ह्यामध्ये ५ हजार २९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शनिवारी संध्याकाळपर्यंत ८६६ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
साडेदहा हजार रुग्णांवर उपचार
जिल्ह्यामध्ये एकूण १४ लाख ९ हजार २८८ नमुने तपासण्यात आले. त्यामधून २ लाख १९ हजार ९ बाधित आढळले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये १० हजार ६७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांवर भर दिलेला आहे.