सातारा जिल्ह्यात ८५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:08 PM2018-03-11T23:08:39+5:302018-03-11T23:08:39+5:30
संजय कदम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षी
पेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तर चालूवर्षी ८ मार्चअखेर ८३ लाख ८३ हजार ८२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू हंगामात किमान ३५ ते ४० लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन होईल, असा अंदाज कारखानदारांकडून वर्तवला जात आहे. पुढील हंगामात आजपर्यंतच्या गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक गाळप सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने केले आहे. तर साखर उत्पादनातही सह्याद्री सहकारी साखर कारखाना आघाडीवर राहिला आहे. या पाठोपाठ कृष्णा साखर कारखाना दुसºया स्थानावर आहे. मात्र, सह्याद्रीपेक्षा कृष्णा साखर कारखान्याचा उतारा मात्र अधिक आहे.
एका बाजूला साखरेचे उत्पादन वाढत असले साखरेच्या दरात अजून तरी म्हणावी अशी वाढ होत नसल्याने व कारखान्यात तयार होणाºया इतर उपप्रकल्पांनाही दर नसल्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत देण्याबाबत कारखानदार उदासीन आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
चालू हंगामाचा शेवट २५ ते ३० एप्रिलपर्यंत होणार असल्याने अजून किमान ५५ दिवस चालणाºया जिल्ह्याच्या गाळप हंगामात प्रतिदिन ५१ हजार ४५० क्षमतेनुसार सर्व कारखाने सुरू राहिले तर किमान २८ लाख क्विंटल साखर उत्पादन वाढू शकेल. मात्र, वाढता उन्हाळा आणि शिल्लक ऊस उत्पादन लक्षात घेता १० ते १५ लाख क्विंटल असे उत्पादन शक्य आहे. गतवर्षी ६७ लाख ४८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते.
या हंगामात गतवर्षी पेक्षा सरासरी २० टक्के अधिक
साखर उत्पादन झाले असले तरी पुढील हंगामात चालू हंगामापेक्षा अधिक ऊस उपलब्ध असल्याने जिल्ह्यात साखर उत्पादनाचा
उच्चांक प्रस्थापित होईल, अशी
आशा कारखानदार व्यक्त करीत आहेत.
कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये
२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)
श्रीराम.फलटण(जवाहर) ३,४५,१०० ४,१०,८५०
कृष्णा ८,६१,९५० १०,९९,१८०
किसन वीर, भुर्इंज ४,७८,८९० ६,०४,४७०
लो.बा. देसाई १,८४,१७५ २,१५,७००
सह्याद्री ९,७४,५३० ११,९४,६७०
अजिक्यंतारा ४,५७,८८० ५,५९,२३०
रयत ३,३८,८३० ४,०७,६१०
खंडाळा तालुका १,९४,६५० २,५१,६००
कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये
२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)
न्यू फलटण २,७३,६०० ३,०१,९००
जरंडेश्वर ६,३८,४०० ८,७४,३८०
जयवंत शुगर ५,१४,६०० ६,३२,१५०
ग्रीन पॉवर ४,६६,५९० ५,७१,१९०
स्वराज ३,७१,९३० ४,९१,०४०
शरयू ६,४७,२०० ७,९६,१५०
एकूण ६७,४८,३२५ ८३,८३,१२०