८८ वर्षांच्या आजीबाई निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 04:44 AM2018-09-12T04:44:42+5:302018-09-12T04:44:44+5:30

शाळा-महाविद्यालयांना प्रवेश घ्यायचाय किंवा निवडणूक लढवायचीय म्हणून जात पडताळणी कार्यालयात तरुणांची कायमच वर्दळ असते

In the 88-year-old Aajibai elections | ८८ वर्षांच्या आजीबाई निवडणुकीच्या रिंगणात

८८ वर्षांच्या आजीबाई निवडणुकीच्या रिंगणात

Next

सातारा : शाळा-महाविद्यालयांना प्रवेश घ्यायचाय किंवा निवडणूक लढवायचीय म्हणून जात पडताळणी कार्यालयात तरुणांची कायमच वर्दळ असते; परंतु साताऱ्यातील जात पडताळणी कार्यालयात मंगळवारी सकाळी चक्क ८८ वर्षांच्या आजीबाई आल्या. त्यांना पाहून तेथील कर्मचारीही दचकले. विचारपूस केली असता समजले की, चांदवडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे. शांताबाई शिवराम कुंभार असे या आजीबार्इंचे नाव आहे.
वाई तालुक्यातील चांदवडी पुनर्वसन या गावातील शांताबाई यांनी इतर मागासवर्गासाठी नवलाई वॉर्डमधून मंगळवारी अर्ज दाखल केला. वयोमानाने चालता येत नसतानाही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इतरांच्या मदतीने त्या जात पडताळणीची पोचपावती घेण्यासाठी कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर वाई तहसील कार्यालयात जाऊन त्यांनी दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.
शांताबाई यापूर्वी दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत होत्या. २०१८ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा तिसºयांदा अर्ज दाखल केला असून, या वॉर्डात त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध विजयी होणार, असा विश्वास बोलून दाखविला.
>लागिरं झालं जी... नंतर पुन्हा चर्चेत
वाई तालुक्यातील चांदवडी गाव ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे राज्यात गाजत आहे. त्यात अठ्ठ्याऐंशी वर्षीय आजीबार्इंनी उमेदवारी दाखल केल्याने हे गाव राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.

Web Title: In the 88-year-old Aajibai elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.