Satara- तापोळा-बामणोली परिसर विकासासाठी ९०० कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

By नितीन काळेल | Published: April 26, 2023 01:34 PM2023-04-26T13:34:21+5:302023-04-26T13:36:14+5:30

कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या पुलाचे काम लवकरच सुरू होणार

900 crore fund for the development of Satara-Tapola-Bamanoli area, Chief Minister Eknath Shinde informed | Satara- तापोळा-बामणोली परिसर विकासासाठी ९०० कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

Satara- तापोळा-बामणोली परिसर विकासासाठी ९०० कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

googlenewsNext

सातारा : पर्यटनक्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. यासाठीच तापोळा, बामणोली परिसरातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे. लवकरच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बामणोली-दरे पुलाचे काम सुरू होणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच तापोळा, बामणोली परिसर विकासासाठी ९०० कोटींचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

तापोळा, ता. महाबळेश्वर येथे तापोळा-महाबळेश्वर रस्त्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘तापोळा ते महाबळेश्वर रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणी येत असतात. या अडचणीमुळे काही पर्यटक तापोळा भागात येणे टाळत होते. पण, आता हा रस्ता रुंद आणि मजबूत करण्यात येत आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक तापोळा भागात येईल. या रस्त्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत असल्याचा आनंद आहे. लोकांनीही पर्यटनाच्यादृष्टीने व्यवसाय वाढवावा. तापोळा, बामणोलीचा परिसर निसर्गसंपन्न आहे. याचा विकास करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

तापोळा, बामणोली परिसराच्या विकासासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून बामणोली दरे पुल, आपटी तापोळा पुल, आहेरी तापोळा पुल यासह विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यात येत आहे. पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र निर्माण होईल असा या परिसराचा विकास होणार आहे. या दुर्गम भागातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही. असा या परिसराचा विकास केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी महाबळेश्वर-तापोळा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणसाठी ७५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

Web Title: 900 crore fund for the development of Satara-Tapola-Bamanoli area, Chief Minister Eknath Shinde informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.