कोयना धरणात ९१ टीएमसी पाणी; दरवाजे साडेपाच फुटांवर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:10+5:302021-07-28T04:41:10+5:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४६, नवजा ४५ आणि महाबळेश्वर ...

91 TMC water in Koyna Dam; The doors stand at five and a half feet | कोयना धरणात ९१ टीएमसी पाणी; दरवाजे साडेपाच फुटांवर कायम

कोयना धरणात ९१ टीएमसी पाणी; दरवाजे साडेपाच फुटांवर कायम

Next

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४६, नवजा ४५ आणि महाबळेश्वर सर्वाधिक ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवकच होत असल्याने विसर्ग सुरू आहे. धरणाचे सहाही दरवाजे साडेपाच फुटावर कायम आहेत. तसेच इतर प्रमुख धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात तुफान पाऊस पडत होता. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने नवीन विक्रम नोंदविला. या धुवाधार पावसामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. कोयनासारख्या धरणात एका दिवसांत १६ टीएमसीवर पाणीसाठा वाढला. हा आतापर्यंतचा एक विक्रम ठरला. पाण्याची आवक वाढल्याने सर्वच धरणे भरु लागली आहेत.

मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील साठा ९०.९९ टीएमसी झाला होता. धरणाचे सर्व सहा दरवाजे साडेपाच फुटांवर उघडण्यात आलेले आहेत. त्यातून ३३४८८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्यूसेक पाणी सोडणे सुरूच आहे. त्यामुळे कोयनेतून एकूण ३३,४८८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. त्यामुळे कोयनेला पूर कायम आहे.

दरम्यान, जूनपासून कोयनेला २,९१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला ३,७४४ आणि महाबळेश्वर येथे ३,७३५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर जावळी, वाई, पाटण, सातारा या तालुक्यांतही चांगला पाऊस होत आहे.

चौकट :

प्रमुख धरणांतील विसर्ग असा :

मंगळवारी सकाळच्या सुमारास धोम धरणातून ४,००८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. कण्हेरमधून ४३६१, कोयना ३३४८, बलकवडी ६६१, तारळी ३,१६५ आणि उरमोडी धरणातून १,६५१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

................................................................

Web Title: 91 TMC water in Koyna Dam; The doors stand at five and a half feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.