जिल्हा परिषदेतील ९४ कर्मचारी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:06+5:302021-06-01T04:30:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दरवर्षी मे महिन्यात सर्व विभागातच सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा असतो. अशाच प्रकारे यावर्षीही ...

94 Zilla Parishad employees retired | जिल्हा परिषदेतील ९४ कर्मचारी सेवानिवृत्त

जिल्हा परिषदेतील ९४ कर्मचारी सेवानिवृत्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दरवर्षी मे महिन्यात सर्व विभागातच सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा असतो. अशाच प्रकारे यावर्षीही जिल्हा परिषदेचे ९४ अधिकारी-कर्मचारी सोमवारी म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी निवृत्त झाले. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील १९ आणि प्राथमिक शिक्षणकडील ६६ जणांचा समावेश आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी वयाची अट आहे. नोकरी मिळविताना व सेवानिवृत्तीलाही अट लागू असते. त्यामुळे नोकरी करताना वयाची अट पूर्ण केल्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होतात. यामुळे प्रत्येक महिन्यात विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी निवृत्त होतात. पण, मे महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्यांचा आकडा अधिक असतो. कारण, पूर्वीच्या काळी जन्मतारखेच्या नोंदी कमी प्रमाणात होत असल्याने शाळेत साधारणपणे अनेकांची एक जून अशी जन्मतारीख असते. यामुळे मे महिन्यातील सेवानिवृत्तांची संख्या अधिक राहते.

अलीकडील काळात मे महिन्यात अधिक संख्येने सेवानिवृत्त होणाऱ्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. याला कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांच्या जन्म नोंदी वेळेवर होत आहेत. यामुळे येत्या काही वर्षांत मे महिन्यात अधिक संख्येने सेवानिवृत्त होणाऱ्यांचा आकडा कमी होणार आहे.

दरम्यान, ३१ मे रोजी जिल्हा परिषदेतील १०-२० नव्हे, तर तब्बल ९४ सेवानिवृत्त झाले आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील संख्या सर्वाधिक ६६ एवढी आहे, तर सामान्य प्रशासन विभागातील १९ जण, तर आरोग्य विभागातील नऊ जणांचा समावेश आहे. गेल्यावर्षी १३४ कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले होते.

फोटो ३१सातारा zp सेवानिवृत्त फोटो...

फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव उपस्थित होते.

.........................................................................

Web Title: 94 Zilla Parishad employees retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.