जिल्हा परिषदेत ९७२ नोकऱ्या; एका जागेसाठी ७७ जण परीक्षेस २१ संवर्ग
By नितीन काळेल | Published: September 1, 2023 06:05 PM2023-09-01T18:05:10+5:302023-09-01T18:05:17+5:30
७४ हजार ५७८ उमेदवारांनी भरला अर्ज
सातारा : मागील काही वर्षांपासून रखडलेली आणि जिल्हा परिषदेतील रिक्त तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी २१ संवर्ग असून ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज केला आहे. याचाच अर्थ सरासरी एका नोकरीसाठी ७७ जण परीक्षार्थी झाले आहेत.
राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदाच्या भरतीबाबत सूचना केली आहे. त्यानुसार राज्यात ही भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. सतारा जिल्हा परिषदेतीलही तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी ३१ मार्च २०२४ ची संभाव्य रिक्त पदे ग्राह्य धरण्यात आलेली आहेत. एकूण २१ संवर्गाचा भरतीत समावेश आहे. शासनस्तरावरुन करण्यात आलेल्या सूचनेनुसार ही भरती योग्य पदातून १० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी आणि २० टक्के अनुकंपा पदे वगळून ९७२ पदांसाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी होत आहे.
इतर जिल्ह्यांसाठीही केला अर्ज...
जिल्हा परिषद भरती राज्यात सुरु आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी अन्यही जिल्ह्यात अर्ज केला आहे. मात्र,
एकाच पदासाठी एकापेक्षा अनेक जिल्हा परिषदेत अर्ज करू नये असे आवाहन प्रशासनाने केलेले. कारण परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने एका उमेदवाराला एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे. तसेच परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने अडचण येणार आहे.
भरतीसाठी अर्ज आले असे...
पद नाव जागा अर्ज संख्या
आरोग्य पर्यवेक्षक ०१ ११
आरोग्य सेवक पुरुष ४० टक्के ७६ २०८६५
आरोग्य सेवक पुरुष ५० टक्के हंगामी फवारणी १७० ९४४७
आरोग्य सेवक महिला ३५३ १९१८
औषध निर्माण अधिकारी ३५ ४९९१
कंत्राटी ग्रामसेवक १०१ १३५५०
कनिष्ठ अभियंता स्थापत्य ३३ २६२७
कनिष्ठ अभियंता विद्युत ०१ ३८४
कनिष्ठ आरेखक ०२ १२
कनिष्ठ लेखा अधिकारी ०४ १३३
कनिष्ठ सहाय्यक प्रशासन ६९ ९५४५
कनिष्ठ सहाय्यक लेखा ०७ ११३३
पर्यवेक्षिका ०३ ४०७
पशुधन पर्यवेक्षक ४२ ९१६
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०४ १०७५
वरिष्ठ सहाय्यक प्रशासन ०२ ६८३
वरिष्ठ सहाय्यक लेखा १० ६६३
विस्ताराधिकारी कृषी ०१ १११
विस्तार अधिकारी शिक्षण ०२ १२५
विस्तार अधिकारी सांख्यिकी ०५ १९६०
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ५२ ३८२२