जिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:21 PM2020-07-02T16:21:56+5:302020-07-02T16:23:18+5:30

सातारा जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात अत्यंत चमकदार कामगिरी केली असून, गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणले आहेत तर १५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच २६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

988 serious crimes were detected in the district during the year | जिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघड

जिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघड

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडपोलिसांची चमकदार कामगिरी : १५ गुन्हेगारी टोळ्यावंर मोक्का

सातारा : जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात अत्यंत चमकदार कामगिरी केली असून, गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणले आहेत तर १५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच २६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात केलेल्या कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे. खून ७१, खुनाचा प्रयत्न १३२, दरोड्याचे ३९ गुन्हे, जबरी चोरीचे ११२ख चेन स्नॅचिंग ११, घरफोडी चोरीचे १०७, इतर चोरीचे ५१६ असे गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

निर्भया पथकासाठी तीन जीप मिळाल्या असून, या जीपमधून निर्भया पथकाकडून गस्त घातली जात आहे. त्यामुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रकारही आटोक्यात आले आहेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधित तक्रारीसांठी भरोसा सेल स्थापन करण्यात आले असून, या सेलच्या माध्यमातून अनेक तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.

Read in English

Web Title: 988 serious crimes were detected in the district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.