भावकीतीलच मुलावर जडले प्रेम; बदनामीच्या भिती पोटी जन्मदात्यांनीच केला पोटच्या मुलीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:57 AM2022-05-03T11:57:55+5:302022-05-03T12:03:59+5:30

क-हाडजवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून होते.

A 17-year-old girl who fell in love with a boy was murdered by her parents in karad | भावकीतीलच मुलावर जडले प्रेम; बदनामीच्या भिती पोटी जन्मदात्यांनीच केला पोटच्या मुलीचा खून

छाया : गणेश काटेकर

googlenewsNext

क-हाड/कुसूर (जि. सातारा) : भावकीतीलच मुलाच्या प्रेमात पडलेल्या १७ वर्षीय मुलीचा जन्मदात्या आईवडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून खून केल्यानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह डोंगरात पुरला होता. पोलिसांनी पंधरा दिवसांनंतर मृतदेह बाहेर काढला.

भावकीतीलच युवक जो नात्याने चुलता लागतो, त्याच्या प्रेमात मुलगी पडली पडली होती. दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचे नक्की केले होते. मात्र, ही सोयरीक पसंद नसल्यानेच आई. वडिलांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

क-हाडजवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून होते. त्यांनी मुलीला संपविण्याचा निर्णय घेतला. १७ एप्रिल रोजी समजूत घालण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला जवळच असलेल्या मामाच्या गावाकडे नेले. त्याठिकाणी निची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, तरीही मुलगी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आई-वडील मुलीला घेऊन डोंगर परिसरात गेले. त्याठिकाणी त्यांनी दोरीने गळा आवळून मुलीचा खून करून मृतदेह डोंगरामध्ये काढलेल्या खड्यात पुरला.

दुसऱ्या दिवशी मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेल्याचे सांगत त्यांनी कहाड ग्रामीण पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गत पंधरा दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. गावात केलेल्या चौकशीवरून संशय बळावला. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने आई-वडिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

चार दिवस बाप खोदत होता खड्डा

पोटच्या मुलीचा खून करण्यापूर्वी सलग चार दिवस बाप डोंगरात एकटाच खड्डा खोदत होता. त्यानंतर समजूत घोलण्याच्या बहाण्याने बापासह आईने मुलीला त्या खड्याजवळ नेले. बापाने गळा आवळला. तर आईने तडफडणाया मुलीचे पाय आवळले. त्यानंतर मृतदेह खड्डयात पुरून हे दोघेही निर्विकार चेहयाने घरी निघून गेले.

Web Title: A 17-year-old girl who fell in love with a boy was murdered by her parents in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.