पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान - आशिष जाधव

By प्रमोद सुकरे | Published: August 29, 2022 07:57 PM2022-08-29T19:57:31+5:302022-08-29T19:58:14+5:30

कराड: टी व्ही मीडियासमोर डिजिटल मीडियाच्या रूपाने मोठा भस्मासुर उभा ठाकला आहे. त्याचा आत्मा हरवला असला तरी पत्रकारांसमोर नीतिमूल्य ...

A big challenge for journalists to maintain ethics says Ashish Jadhav | पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान - आशिष जाधव

पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान - आशिष जाधव

Next

कराड: टी व्ही मीडियासमोर डिजिटल मीडियाच्या रूपाने मोठा भस्मासुर उभा ठाकला आहे. त्याचा आत्मा हरवला असला तरी पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान आहे. असे प्रतिपादन लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी व्यक्त केले.

कराड येथे सोमवारी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यात जाधव 'टि व्ही मीडियासमोर डिजिटल मीडियाचे तगडे आव्हान' या विषयावरती बोलत होते .परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विकास भोसले होते.

आशिष जाधव म्हणाले, डिजिटल मीडियाची ताकद खूप मोठी आहे. पण पत्रकारांनी ती ओळखली पाहिजे व त्याचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. डिजिटल मीडियाला व्यवस्थित हाताळले गेले नाही तर तो मीडिया भस्मासुराचे रूप धारण करू शकतो अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

टीव्ही मीडियाचेही वृत्तपत्रांप्रमाणेच एक अर्थकारण आहे. खर्च जास्त होत असल्याने ते चालवणे परवडत नाही. त्यामुळेच आता स्पीड न्यूज चा जमाना आला आहे तर ब्रेकिंग न्यूज ची व्याख्या बदलली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोना काळात डिजिटल मीडिया चांगलाच फोफावला मीही यात तडजोड म्हणून आलो. पण आज त्याचे महत्त्व व व्याप्ती माझ्या लक्षात आली आहे.

सकाळी किसनराव पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार, अँड.रवींद्र पवार, प्राचार्य मोहन राजमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ ,अँड. सदानंद चिंगळे,प्राचार्य डॉ मोहन राजमाने यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी 'प्रसार माध्यमांची जबाबदारी' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी अध्यक्षस्थानी शशिकांत पाटील होते. तर राजेंद्र मांडवकर यांनी 'वृत्तपत्रांचे अर्थकारण' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी मुकुंद भट अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेला सातारा व सांगली जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी देवदास मुळे रुपेश कदम सूर्यकांत शिंदे विनोद मोहिते या पत्रकारांनी प्रातिनिधीक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य शिवाजीराव पाटील, प्रा. डॉ. रमेश पोळ, प्रा. डॉ. तानाजी पाटील, प्रा. डाँ. बाबासाहेब नाईक आदींनी परिश्रम घेतले

Web Title: A big challenge for journalists to maintain ethics says Ashish Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.