Satara: सडावाघापूर घाटात कार ३०० फूट खोल दरीत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:58 AM2023-12-15T11:58:36+5:302023-12-15T11:58:52+5:30

वीज कर्मचारी जखमी : वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

A car fell into a 300-feet deep gorge at Sadavaghapur Ghat in satara | Satara: सडावाघापूर घाटात कार ३०० फूट खोल दरीत कोसळली

Satara: सडावाघापूर घाटात कार ३०० फूट खोल दरीत कोसळली

कोयनानगर : पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या सडावाघापूर घाटात गुजरवाडी गावाजवळील टेबल लँड परिसरात कार ३०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झाला. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. शहाजी व्यंकट भिसे (वय ४५, रा. नवारस्ता, ता. पाटण) असे अपघातात जखमी झालेल्या वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शहाजी भिसे हे कामानिमित्त सडा वाघापूरच्या दिशेने (एमएच ५० ए २१७३) ही कार स्वत: चालवत असताना अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार बाजूला असलेल्या दरीत खोलवर जवळपास ३०० फूट खाली कोसळली. यात शहाजी भिसे हे जखमी झाले तर पलट्या खात गाडी खोल दरीत पडल्याने वाहनाचा चक्काचूर झाला आहे. 

या घटनेची माहिती मिळतात तत्काळ स्थानिक नागरिक व पाटण घटनास्थळी पोहोचले. पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शहाजी भिसे यांना दरीतून बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिकेतून कऱ्हाड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

Web Title: A car fell into a 300-feet deep gorge at Sadavaghapur Ghat in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.