बेकायदेशीरपणे मांडूळ बाळगल्या प्रकरणी वडी येथील एकावर गुन्हा दाखल, वनविभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:16 PM2022-02-03T18:16:52+5:302022-02-03T18:17:08+5:30

वनविभागाच्या कारवाईमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली  

A case has been registered against a person from Wadi in Khatav taluka for illegally carrying a forehead | बेकायदेशीरपणे मांडूळ बाळगल्या प्रकरणी वडी येथील एकावर गुन्हा दाखल, वनविभागाची कारवाई

बेकायदेशीरपणे मांडूळ बाळगल्या प्रकरणी वडी येथील एकावर गुन्हा दाखल, वनविभागाची कारवाई

Next

औंध : बेकायदेशीरपणे मांडूळ बाळगल्याप्रकरणी वनविभागाने वडी ता. खटाव येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे. तर त्याच्याजवळील जिवंत मांडुळ ताब्यात घेतले आहे. ते मांडूळ अंदाजे अडीच ते तीन किलो वजनाचे आहे. नवनाथ भागवत येवले (वय ४२) असे या ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडी येथील नवनाथ येवले याने जिवंत मांडूळ पकडल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा वनसंरक्षक अधिकारी आर. ए. व्होरकाटे व औंधचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पोलीस पथकाने संयुक्तपणे वडी येथे छापा मारून येवले यांच्यासह जिवंत मांडूळ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी मिळाली आहे. वन विभाग व पोलीस पथकाच्या धडक कारवाईमुळे वन्यप्राणी बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमध्ये वनपाल रामदास घावटे, बी. एस. जावीर, बी. एन. जाधव, सी. बी. पाटील, डी. एन. व्हनमाने, एस. एम. तांबोळी, एस. आर. दहिफळे, एम. एन. मोहिते, सर्पमित्र प्रसाद गुरव यांनी सहभाग घेतला. 

Web Title: A case has been registered against a person from Wadi in Khatav taluka for illegally carrying a forehead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.