मुलीच्या नावानं इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट, अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:49 IST2022-02-18T18:14:48+5:302022-02-18T18:49:28+5:30
संबंधित विद्यार्थी या अकाउंटचा वापर मुलीच्या नावाने करत होता.

मुलीच्या नावानं इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट, अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
सातारा : इंस्टाग्रामवर मुलीच्या नावानं बनावट अकाउंट काढून अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित हा सातारा तालुक्यातील एका अग्रगण्य शाळेचा विद्यार्थी आहे. त्याने लेट इगो २३५० या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट काढले होते. संबंधित विद्यार्थी या अकाउंटचा वापर मुलीच्या नावाने करत होता.
यावरुन त्याने मुलगी बोलत आहे, असे भासवून अश्लील चॅटिंग, फोटो, व्हिडिओ एका मुलीला पाठवले. संबंधित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.